LIC Premium : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जर तुम्ही LIC च्या जीवन विमा पॉलिसीचा प्रीमियम भरू शकत नसाल. तर आपल्या EPF खात्याचा वापर करून हा प्रश्न सोडवू शकता. अशा वेळी तुम्ही आपल्या EPF खात्याचा वापर करून LICचा प्रीमियम भरू शकता.


कोरोनाकाळात हा पर्याय उपयोगी येऊ शकतो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना संसर्गामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम अनेकांच्या पगारावर झाला आहे. काहींना पगार कमी देण्यात आला आहे. सर्व प्रकारची काटकसर करूनही LIC चा हफ्ता भरण्यास रक्कम कमी पडत असेल तर, अशा परिस्थितीत EPF खाते उत्तम पर्याय आहे. 


EPF वरून LICचा प्रीमियम कसा भरायचा?


जर तुम्ही पगारदार आहात. तर तुमच्या EPFखात्यातून LIC चा प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला EPFOला सूचना द्यावी लागेल. किंवा नंतर काही हफ्ता जमा करण्यासाठी फॉर्म14 जमा करणे गरजेचे आहे. हा फॉर्म EPFO च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपल्या अर्जाला मंजूरी मिळाल्यानंतर आपल्या EPF खात्यातून हफ्त्याच्या तारखेला LIC प्रीमियम आपोआप कापला जाईल.


या सुविधांच्या काही मर्यादा


  • या सुविधांचा लभा घेण्यासाठी आपले EPF खाते कमीत कमी 2 वर्षाचे असायला हवे.  

  • EPF खात्यात LICचा प्रीमियम 2 वर्षांपर्यंत भरला जाऊ शकतो. इतकी रक्कम जमा हवी.

  • जर तुमच्या EPF खात्यात पुरेशी रक्कम नसेल तर प्रीमियमचा भरणा आपोआप बंद होईल.