नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये वीज पडल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी वीज पडल्यामुळे आतापर्यंत जवळपास 68 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात वेग-वेगळ्या भागात वीज पडल्यामुळे आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त मृत्यू प्रयागराजमध्ये झाले आहेत. त्यामुळे परिसरात  एकचं खळबळ माजली आहे. यूपी सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रयागराजमध्ये जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला आहे.  कानपूर देहातमध्ये पाच तर कौशंबीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे फिरोझाबादमध्ये तीन आणि उन्नाव तसेच चित्रकूटमध्ये प्रत्येक दोन जणांना वीज पडल्याने मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानबद्दल सांगायचं झालं तर वीज पडल्यामुळे याठिकणी जवळपास 20 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकड्यांनुसार, रविवारी राज्यातील वेगवगळ्या भागांमध्ये वीज पडल्यामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. जयपूरमध्ये 11 धौलपूरमध्ये 3,  कोटा 4, झालावाड 1 आणि बारांमध्यें देखील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आगहे.



या दुर्घटनेत निधन झालल्या व्यक्तींच्या कुटुंबाला सरकारने 5 लाख रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी 1 लाख रूपये आपत्कालीन मदत निधीतून तर 1 लाख रूपये मुख्यमंत्री मदत निधीतून देण्यात येणार आहेत. अशी घोषणा  मुख्यमंत्री  अशोक गहलोत यांनी केली आहे. शिवाय त्यांनी दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली आहे. 


मध्य प्रदेशात देखील वीज पडल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात वेग-वेगळ्या भागात वीज पडल्यामुळे जवळपास 7 जणांचा मृत्यू झाला आहे. श्योपूर आणि ग्वाल्हेर जिल्ह्यात वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे.