...तर तुमचे पॅनकार्ड होईल निष्क्रिय!
पॅनकार्ड सध्यासाठी एक महत्वाचे डॉक्युमेंट बनलेय. आयटी रिटर्न भरणे वा बँकेत खाते खोलणे असो.
मुंबई : पॅनकार्ड सध्यासाठी एक महत्वाचे डॉक्युमेंट बनलेय. आयटी रिटर्न भरणे वा बँकेत खाते खोलणे असो. पैशाच्या प्रत्येक देवाणघेवाणीला पॅनकार्ड गरजेचे असते. इतकंच नव्हे सरकारने शॉपिंगसाठीही पॅनकार्ड गरजेचे केलेय. पॅनकार्ड एक असे डॉक्युमेंट आहे जे तुमचे फायनान्शियल स्टेटस दाखवते. मात्र तुमचे हे पॅनकार्ड तुमच्यासाठी रद्दीही ठरु शकते. जर तुम्ही ३१ ऑगस्टपर्यंत पॅनकार्डसंबंधित महत्त्वाचे काम केले नाही तर तुमचे पॅनकार्ड रद्दीही होऊ शकते.
पॅन-आधार लिंक करणे गरजेचे
पॅनकार्डला आधार लिंक करण्याची तारीख ३१ ऑगस्ट आहे. जर तुम्ही आतापर्यंत पॅनकार्ड आधारला लिंक केले नसेल तर भविष्यात तुम्हाला समस्येचा सामना करावा लागू शकतो. सरकारने ११.४४ लाख पॅनकार्ड बंद केलेत अथवा त्यांना निष्क्रिय कॅटॅगरीमध्ये टाकलेय. ३१ ऑगस्टची मुदत संपल्यानंतर आधार-पॅन लिंक होणार नाही.
डेडलाईनंतर रद्दी होणार पॅनकार्ड
गेल्या वर्षी सरकारने टॅक्सपेयर्सना आयकर रिटर्न भरण्यासाठी आधारला पॅनशी जोडण्यास सांगितले होते. दरम्यान याची डेडलाईन वाढवण्यात आली. मार्च २०१८पर्यंत पॅन-आधारला जोडण्याची अंतिम तारीख होती. मात्र सुप्रीम कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरु असल्याने ही तारीख वाढवण्यात आली. आता ३१ ऑगस्ट ही अंतिम डेडलाईन देण्यात आलीये. गेल्या काही दिवसांमध्ये ३० कोटी पॅनकार्डधारकांनी तब्बल २५ टक्के पॅन नंबर आधारशी जोडलेय. यातील ३ कोटी पॅनकार्ड गेल्या वर्षी आधारशी जोडण्यात आले होते.
याआधीही निष्क्रिय झालेत पॅनकार्ड
सरकारने गेल्या वर्षी रिटर्न भरण्याच्या अवधीदरम्यान ११.४४ लाख पॅनकार्ड डीअॅक्टिव्हेट केले होते. अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्या नावावर एकाहून अधिक पॅनकार्ड असतील ती पॅनकार्ड रद्द करण्यात येतील.