मुंबई: आई आपल्या पिल्लांसाठी स्वत:चा जीवही देऊ शकते याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात मात्र आई मोठ्या हिंमतीनं लढून दोघांचा जीव वाचवल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसेल की म्हैस रेडकूसोबत जात आहे. त्याचवेळी सिंहाचा कळप या रेडकूवर हल्ला करतो. म्हैस त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करते मात्र सिंह रेडकूला घेऊन पळण्याच्या तयारीत असतो मात्र म्हैस त्याला रोखते. सिंहाशी भिडून ती आपल्या रेडकूला सुखरूप सिंहाच्या तावडीमधून सोडवते.



या म्हशीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 28 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 53 लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. आई आपल्या पिल्लासाठी कोणत्याही संकटासमोर आपला जीव धोक्यात घालून लढू शकते हे या व्हिडीओमधून दिसत आहे.