निष्पाप मुलीने पोलिस कर्मचार्यांसोबत काय केलं व्हिडीओत पाहा
सध्या संपूर्ण देश कोरोनामुळे संकटात आहे. कोरोनाविरूद्ध आपले युद्ध सुरु आहे.
मुंबई : सध्या संपूर्ण देश कोरोनामुळे संकटात आहे. कोरोनाविरूद्ध आपले युद्ध सुरु आहे. डॉक्टरांपासून पोलिसांपर्यंत सगळेच साथीच्या रोगा विरूद्ध दिवसरात्र लढा देत आहेत. तर सर्वसामान्य लोकं आपल्या घरी राहून, सोशल डिस्टंसिंग ठेऊन, तसेच कोरोनाचे गाइड लाईन्स पाळून आपल्या पद्धतीने यामध्ये योगदान देत आहेत. सध्या लोकं घरी असल्यामुळे ते सोशल मीडियावरुन आपले मनोरंजन करत आहेत.
काही लोकं, मीम्स शेअर करत आहेत, तर काही लोकं व्हिडीओ शेअर करुन समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू उमटवत आहेत. अशातच सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ज्याने लोकांची मने जिंकली आहेत. या व्हिडीओमध्ये, एका लहान मुलीने आपल्या कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचार्यांसोबत जे केले ते कौतुकास्पद आहे.
असे म्हटले जाते की, लहान मुले हे देवाचे रूप असतात. ते निर्मळ असतात, ते कोणाचीही फसवणूक करु शकत नाहीत. आपण या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे पाहू शकतो की, काही पोलिस कोरोना कर्फ्यू दरम्यान आपले कर्तव्य पार पाडत आहेत. तेव्हा एक लहान मुलगी आपल्या हातात काठी घेऊन पोलिस कर्मचाऱ्यांच्या हातात देते. तिचे हे वागणे खूप सोज्वळ आहे. तिचे हे निष्पाप वागणे पाहून लोकांनी या व्हिडीओला खूप पसंत केले.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ भारतीय पोलिस अधिकारी दीपांशु काबरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर शेअर केला आहे. व्हिडीओसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "निष्पाप मुलांना देखील परिस्थितीची जाणीव आहे". आता हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर बरेच कमेंट्स देखील येत आहेत.