लिव्ह इन रिलेशनशिप अनैतिक तसेच सामाजिकरित्या चुकीचे; न्यायालयाचा निर्वाळा
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपल्ससाठी न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.
नवी दिल्ली : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपल्ससाठी न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. लिव्ह इन रिलेशनशिप हे नैतिक आणि सामाजिकरित्या चुकीचे आहे. हे स्विकाहार्य नसल्याचे न्यायालयाने एका याचिकेत म्हटले आहे. पंजाब - हरियाणा न्यायालयात एका 19 वर्षीय तरुणी आणि 22 वर्षीय तरुणीने याचिका दाखल केली होती. आपल्या याचिकेत तरुणीच्या कुटूंबियांकडून आपल्या जीवाला धोका असल्यामुळे पोलीस संरक्षणाची मागणी मुलाने केली होती.
उच्च न्यायालयाने काय म्हटले ?
उच्च न्यायालयाने सुनावणी करताना म्हटले की, 'याचिकाकर्ते या याचिकेच्या निमित्ताने लिव्ह इन रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब करू इच्छितात. परंतु हे नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या चूकीचे आहे. असे नाते स्विकाहार्य नाही. अशा याचिकेवर कोणताही आदेश दिला जाऊ शकत नाही. ही याचिका फेटाळून लावण्यात येत आहे'.
याचिकाकर्त्याचे वकीलांचे म्हणने आहे की, 'मुलगा आणि मुलगी गेल्या 4 वर्षापासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. सध्या ते घरातून पळून येऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. मुलीच्या कुटूंबिय या नात्याच्या विरोधात आहेत. मुलीच्या जन्माविषयीचे कागदपत्र तिच्या कुटूंबियांकडे आहे. त्यामुळे त्यांचे अद्याप लग्न झालेले नाही.'
दोन्ही कुटूंबियांकडून त्यांच्या जीवाला धोका आहे. असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. तरी न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.