मस्कट : आपल्या आखाती देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी ओमान येथे पोहोचले. राजधानी मस्कट येथे पंतप्रधान मोदींचा राजकीय सन्मान करण्यात आला.


३४ हजार भारतीयांशी थेट संवाद 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पंतप्रधानांनी सुल्तान कबूस स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले. या ठिकाणी त्यांनी ३४ हजार भारतीयांशी थेट संवाद साधला. 
 
 एअरपोर्टपासून ते थेट हॉटेलमध्ये पोहोचले. याठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी तिथले भारतीय मोठ्या संख्येत उपस्थित होते. 


मोदींसमोर घोषणा 


 पंतप्रधान मंचावर पोहोचल्यावर भारतीय नृत्य आणि संगिताचे सादरीकरण करण्यात आले. दरम्यान तिथे 'भारत माता की जय' आणि 'मोदी-मोदी' अशा घोषणा देण्यात आल्या.


आखाती देशांशी मैत्रीचे संबंध 


सरकारकतर्फे एक राजदूत असतो. पण इथे लाखो राजदूत बसले आहेत. 


गेल्या ३ वर्षात भारताचे आखाती देशांशी दृढ संबध आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 


भारताची होणारी प्रगती पाहता आखाती देशांची भारतातील स्वारस्य वाढत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.