अयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी नोव्हेंबर २०१८ मध्ये राममंदिराचा निकाल येण्याआधी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच अयोध्येला जात आहेत. महाविकासआघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याचं औचित्य साधत उद्धव ठाकरेंचा हा दौरा आयोजित करण्यात आलाय.


उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यातील ठळक घडामोडी


- अयोध्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दाखल 


- मुख्यमंत्री अयोध्याच्या दिशेने रवाना


- दौऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेमंडळी हजर राहणार 



- क्रीडा मंत्री सुनील केदार अयोध्येत दाखल 


- बाळासाहेबांचं हिंदुत्व राहिलं आहे का? - अशिष शेलार 


- शिवसैनिकांवर अयोध्या स्टेशनवर पुष्पवृष्टी 


- २ हजार शिवसैनिक अयोध्येत दाखल


- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल 


- हॉटेल पंचवतीमध्ये मुख्यमंत्री कुटुंबासोबत दाखल झाले आहेत. 


- थोड्याच वेळात घेतील पत्रकार परिषद 


- आजचा ऐतिहासिक क्षण - संजय राऊत 


- पुन्हा एकदा रामलल्लाचं  आशिर्वाद घेण्यासाठी आलो - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


- 'या ठिकाणी नेहमी येत राहील'


- आमच्या संस्थेकडून मंदिरासाठी १ कोटी रूपये देणार - उद्धव ठाकरे