Breaking News Live : खासदार कंगना राणावतची अजब मागणी, महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूटच मागितला
Breaking News LIVE: पुण्यातील एका पबच्या वॉशरूममध्ये तरुण अमली पदार्थांचं सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. अमली पदार्थांच्या घटना वारंवार समोर येत असल्याने पुणे उडता पुणे झाले की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
Breaking News LIVE: आजपासून अठराव्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होत असून, या पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीने संसदेचं कामकाज सुरू होणार आहे. याशिवायही देशात आणि राज्यात विविध घडामोडीसुद्धा सुरु असणार असून, या सर्व अपडेट्स एका क्लिकवर पाहता येणार आहेत.
Latest Updates
अभिनेत्री खासदार कंगना राणावतची अजब मागणी, महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूटच मागितला.इतर रूम छोट्या असल्याने थेट CM सुटची मागणी. सदनातूनच राज्यातील एका बड्या नेत्याला कंगनाचा फोन.सूट देता येत नाही,MH सदनचे स्पष्टीकरण.
पुणे कल्याणी नगर हिट ॲंड रन प्रकरणातील मृत तरुण-तरुणींच्या पालकांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट.
आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही कायदेशीर पावलं उचलावी लागल्यास राज्य सरकार तेही करणार, असे ते यावेळी म्हणाले. अपवादात्मक परीस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन्ही कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखाची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहीती.इथेनॉल निर्मिती आणि विक्री परवाना रद्द केल्याने 130 कोटीच्या दरम्यान साखर कारखान्याचे नुकसान होण्याचा अंदाज.दुपारी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के पी पाटील यांनी पत्रकार बैठक घेतल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून इथेनॉल निर्मिती प्रकल्प रद्द.
नीट पेपर फूटी प्रकरणी अटकेत असलेल्या जलील पठाण याला पोलिसांनी केले कोर्टात हजर केले या प्रकरणी आता २ तारखेपर्यंत आरोपी जलील पटान यांना पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
पुणे पुण्यातील एल थ्री या पबवर पतित पावन संघटनेने दगडफेक केलेली पब चे बॅनर फोर्डिंग फोटले आहे 10 ते12 जणांनी तोडफोड केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत.
पुण्यातल्या ड्रग्जचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये टॉयलेटमध्ये ड्रग घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून नवीन चेहऱ्यांना संधी देणार शरद पवार यांची माहिती. सोडून गेलेल्या आमदारच्या जागी नवीन चेहरा देणार. शरद पवार गटाकडून नवीन चेहऱ्यांना संधी बाबत पक्षात सकारात्मक वातावरण. शरद पवार गटाला मिळणाऱ्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.
पुणे L3 बार प्रकरणी आरोपींना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 8 आरोपींना 29 जून पर्यंत कोठडी. सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा
Breaking News Live : पुण्यात पबच्या वॉशरूममध्ये अमली पदार्थांचं सेवन
पुण्यातील एका पबच्या वॉशरूममध्ये तरुण अमली पदार्थांचं सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. अमली पदार्थांच्या घटना वारंवार समोर येत असल्याने पुणे उडता पुणे झाले की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. नियमांचं उल्लंघन करत दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालणारे पब्ज आणि बार... व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईचा धांगडधिंगा आणि त्याही पलीकडे जाऊन पुणे शहराला पडलेला अमली पदार्थांचा विळखा. विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आज बदलतेय.
Breaking News Live : ...म्हणून अजित पवारांना भेटलो; नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितलं
मी आमदार पण आहे. विधानसभेत आम्ही ज्या मागण्या केल्या आसतात. आणि आमच्या मतदार संघातील निधी बाबत जे आश्वासन दिलेले आसते त्या अनुषंगाने ही भेट होती
Breaking News Live : विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी
अकोला जिल्ह्यात तंत्रज्ञानाचे महत्त्व समजणारे राजू वरोकार या शेतकऱ्यानं आपल्या शेतात पेरणीचा नवा प्रयोग केला आहे. 'जीपीएस कनेक्ट' या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी सुरू आहे. सदरचा प्रयोग हा राज्यातून अकोला जिल्ह्यात पहिल्यांदा केला जात असल्याचा दावा शेतकऱ्यानं केला आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची, मजुरांची आणि पैश्याची सुद्धा बचत होत असल्याचं वरोकार म्हणत आहे.
Breaking News Live : शाळेला जाण्यासाठी रस्ता नसल्याने बांधकाम कार्यालयातच भरवली शाळा
बीड माजलगाव तालुक्यातील खतगव्हाण, पिंपरी खु, डिग्रस गावाचा रस्ता उखडल्यानं जिजामाता विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना गेल्या आठ दिवसापासून शाळेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा निवेदनं करूनही रस्ता दुरुस्त न केल्यामुळे जिजामाता विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक पालकांनी चक्क सार्वजनिक बांधकाम कार्यालयातच शाळा भरवली.. अनेक वेळा तक्रारी करून ही रस्ता दुरुस्त केला जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेसाठी जाण्यासाठी हाल होत आहेत त्यामुळे संत झालेल्या पालकांनी आजचक्क सार्वजनिक बांधकाम कार्यालयातच शाळा भरवली.
Breaking News Live : मुख्यमंत्री शिंदे यांचं 'ते' वक्तव्य अंगलट येण्याची शक्यता
'महाराष्ट्रात काही अर्बन नक्सल NGOs ने इंडिया आघाडीला छुपा पाठिंबा दिला आहे’ हे विधान मुख्यमंत्री शिंदे यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण निर्भय बनो लोक-चळवळीचे एक सदस्य बाळकृष्ण उर्फ बंटी निढाळकर यांनी थेट एकनाथ शिंदेंना कायदेशीर नोटिस पाठवली आहे. जर शिंदेंना महाराष्ट्रातील अनेक अर्बन नक्सल NGOs माहिती आहेत तर त्यांनी त्वरित अर्बन नक्सल असलेल्या या सगळ्या NGOs ची माहिती पोलिसांना द्यावी तसेच अशा अर्बन नक्सल सामाजिक संस्थांची यादी जनतेसमोर जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
Breaking News Live : अजित पवार यांच्या भेटीला नाना पटोले
अजित पवार यांच्या भेटीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही नेत्यांमध्ये झाली भेट. मतदार संघातील कामा निमित्त नाना पटोले यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याचे समजते.
Breaking News Live : सर्वच पक्ष आणि राजकारणी जातीपातीमध्ये - राज ठाकरे
जातीवादाचं विष पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतंय. मतदानासाठी हे सगळं असून समाजानं हे समजून घेणं गरजेचं. सर्वच पक्ष आणि राजकारणी जातीपातीमध्ये अडकलेले आहेत.
Breaking News LIVE: मुंबई विमानतळावर प्रवाशांचा संताप
एअर इंडियाच्या विमानाला वारंवार उशीर होत असल्याने प्रवासी संतप्त. सकाळी 11 वाजून 25 मिनिटांचं चे एअर इंडियाचं मुंबई दिल्ली विमान अद्याप आलेलं नाही, त्यामुळे प्रवाशांचा संताप. संतप्त प्रवासी इअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत.
Breaking News LIVE: मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणणं मूर्खपणा... - लक्ष्मण हाके
आरक्षण हे कायद्यानुसार चालत असतं. समाजाचं मागासलेपण पाहून आरक्षण मिळत असतं. कुठल्या तरी व्यक्तीनं झुंडशाहीच्या जोरदार आरक्षण मिळवण्याची भाषा करणं कायद्या विरोधात आहे ही हुकूमशाही प्रवृत्ती आहे. राज्यातील वातावरण बिघडवण्यास अशी वर्तणूक जबाबदार राहतील मंत्री आमदार खासदार ,यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी अभ्यास करूनच वक्तव्य केले पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे. कायदा बनवायला जाणाऱ्या लोकांनी माहिती घेतली नसेल तर हे धोकादायक आहे असं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं.
नाशिक : कडेकोट बंदोबस्तात काशपी धरणामधून पाणी सोडलं; तणाव कायम
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे. गंगापूर समूहातून काशपी धरणामधून गंगापूर धरणात पाणी सोडण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. गेल्या आठवड्यापासून जलसंपदा विभाग हे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. अखेर आज पोलिसांच्या कडेकोड बंदोबस्तामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे. याला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असल्यामुळे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ शकते. जिल्ह्यात विविध धरणांमध्ये केवळ आठ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
Breaking News LIVE: लोकसभेच्या अधिवेशनापूर्वी पंतप्रधांनी आणीबाणीचा उल्लेख करत म्हटलं...
लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेबाहेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्य़ांनी संसदीय कामकाज सुरु होण्यापूर्वी देशाला चांगल्या विरोधकांची अपेक्षा आहे... असं वक्तव्य केलं. यावेळी मोदींनी आणीबाणीची आठवण काढत 25 जून हा दिवस कोणीही विसरू शकत नाही, आणीबाणी हा देशावरचा काळा डाग आहे, असं म्हटलं. यापूर्वीपेक्षा आपण तिपटीनं जास्त काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी देशातील जनतेला दिला.
Breaking News LIVE: लोकसभेत आता आता विरोधकांचा आवाज घुमणार- संजय राऊत
उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकावर निशाणा साधला आहे. "आता ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष काय असतो. विरोधी पक्षनेता पहिल्या बाकावर असेल. 240 चे 275 होतील हे कळणार सुद्धा नाही," असं राऊत म्हणाले. तसेच, "आता विरोधकांचा आवाज घुमणार, मोदी शाह यांचा आवाज चालणार नाही," असंही राऊत म्हणाले.
Breaking News LIVE: पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून जयंत पाटलांचा पोलिसांसह सरकारवर निशाणा
'गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठलाय. ललित पाटील प्रकरणानंतर ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडिओ काल व्हायरल झाले. पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळतेय. तर विद्येच्या माहेरघराची ओळख ड्रग्ज, पब्जचे माहेरघर होतंय. पुणे शहर सत्ताधारी भाजप, शिंदे सरकारमुळे बदनाम होतंय', असा निशाणा जयंत पाटील यांनी साधला आहे.
Breaking News LIVE: ड्रग्ड व्हहिडीओप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मोठी कारवाई
पुण्यातील ड्रग्ज व्हायरल व्हिडिओचं प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मोठी कारवाई. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक निलंबित. पोलीस निरिक्षक (गुन्हे) अनिल माने यांचंही निलंबन. सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांच्यावरही निलंबनाची कारवाई.
Breaking News LIVE: उमरगा तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस
उमरगा तालुक्यातील माडज, गुगळगाव, वागदरी, कोरेगाव, कोरेगाववाडीसह परिसरातील गावात ढगफुटी सदृश्य तुफान पाऊस पडला आहे. मोठा पाऊस पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून पेरणीसाठीचे बियाणे व खते सुद्धा भिजली आहेत. या पावसाचे पाणी माडज, गुगळगाव मार्गे कोरेगाव तलावात व नंतर उमरगा नदी मार्गे बेन्नीतुरा नदीत मिसळत कर्नाटक राज्यात जाते. सध्या शेतकरी यांनी सर्वत्र पेरणी केली आहे पण आताच्या ढगफुटीने शेतकरी यांच्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.
Breaking News LIVE: वाहनाला कट मारण्यावरून संभाजीनगरात राडा
संभाजी नगरात राजा बाजार परिसरात रविवारी मध्यरात्री झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी 30 जणांवर गुन्हे दाखल केले आहे तर सात जणांना दंगलीच्या गुन्ह्या प्रकरणी अटक केलेली आहे.. गाडीला कट का मारला या कारणावरून किरकोळ वाद झाला होता त्याचा पर्यायवासन हाणामारीत झालं होतं आणि दोन्ही बाजू कडून मोठा जमाव आमने सामने आला होता ,पोलिसांना जमाव शांत करायला पहाट उजाडली होती त्यात दिवसभर परिसरात तणावाचे वातावरण होतं आज या प्रकरणात आणखी काही अटक होण्याची शक्यता आहे
Breaking News LIVE: नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं अकोट तालुक्यात गावकऱ्यांपुढं अडचण
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पठार नदीवरील पर्यायी रस्ता पाण्यात गेला आहे आज सलग दुसऱ्या दिवशीही पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांना या मार्गावरून ये - जा करण कठीण झालं आहे. पठार नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्याने पनोरी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. गावातून आपल्या शेतीसाठी आणि दैनंदिन कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात टाकून लोखंडी रॉड वरून जीवघेणे कसरत करून ये - जा करावं लागत आहे.
Breaking News LIVE: मावळातील पवना धरण परिसरात वर्षा विहारासाठी आलेल्या कॉलेज तरुणाचा बुडून मृत्यू
मावळातील पवना धरण परिसरात वर्षा विहारासाठी आलेल्या एका कॉलेज तरुणाचा पवना धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्यातील सिम्बॉसियेस कॉलेज येथील काही विद्यार्थी काल रविवारी मावळात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आले होते. त्यापैकी काही तरुण पवना धरणाच्या बँक वॉटर पाण्यात उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दिल्लीचा रहिवासी असलेला अद्वैवता वर्मा हा तरुण पाण्यात बुडाला.
Breaking News LIVE: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कोल्हापूर बंदची हाक
मंगळवारी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. शहर हद्दवाढ आणि सर्किट बेंच प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यातच आज मध्यरात्रीपासून रिक्षा आणि टॅक्सी देखील बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनांसाठी पासिंग विलंब शुल्क आकारणी रद्द करावी यासाठी आज मध्य रात्रीपासून कोल्हापूर रिक्षा टॅक्सी वाहनधारक समितीतर्फे देखील आंदोलन छेडण्यात आले आहे. उद्या गनिमी काव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळे फासण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय.
Breaking News LIVE: मावळतील इंदोरी जवळील नाणोली गावाच्या शिवारात बिबट्याचा मुक्त संचार
मावळतील इंदोरी जवळील नाणोली गावाच्या शिवारात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. नाणोली मधील प्रतीक भोसले हे शेतीमधील रस्त्याने जात असताना बिबट्या त्याच्या मोबाईलच्या कॅमरात कैद झाला आहे. रस्त्याच्या बाजूला शिकारी साठी दबा देऊन बसलेला बिबट्या प्रतीक भोसले यांना दिसला त्यांनी तात्काळ आपल्या मोबाईल कॅमरात त्याचे चित्रीकरण केले. नाणोली प्रमाणे मावळ तालुक्यातील कामशेत,नायगाव, अहिरवडे या गावातील कुत्री देखील कमी झाल्याचा समोर आला आहे त्यामुळे ह्याभागात देखिल बिबट्याच वास्तव असल्याचं समोर आला आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे यांनी नागरीकांना आव्हान केले आहे की रात्रीच्या वेळी ऐकटे फिरु नये, अन्नाच्या शोधात बिबट्या बाहेर पडत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Breaking News LIVE: मुंबईतील ब्रिटीशकालीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद
मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यानचा ब्रिटिशकालीन 131 वर्षे जुना बेलासिस उड्डाणपूल सोमवारपासून पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. पुढील 18 महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल. या पुलाच्या पाडकामाला सुरुवात करून लवकरच त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
Breaking News LIVE: पुणे पोर्श कार अपघातप्रकरणातील अपडेट
पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी वेदांत अगरवाल ला बाल न्यायालयात हजर करणार
Breaking News LIVE: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बैठक बोलावली आहे. वांद्रे मधील MIG क्लब इथे सकाळी 10 वाजता मनसेची बैठक होणार आहे. राज्यभरातील मनसेचे प्रमुख नेते, सरचिटणीस, तसंच पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
Breaking News LIVE: शपथविधीचा कार्यक्रम दोन दिवस चालणार
संसदेच्या या अधिवेशनादरम्यान शपथविधीचा कार्यक्रम दोन दिवस चालणार आहे. सोमवारी पहिल्या दिवशी 280 खासदार शपथ घेतील, तर मंगळवारी 264 खासदारांना शपथ दिली जाईल. नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून भर्तृहरी महताब यांची राष्ट्रपतींनी निवड केलीय. 26 तारखेला लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. 27 तारखेला दोन्ही सभागृहातील सदस्यांसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण होणाराय. पंतप्रधान 2 जुलैला लोकसभेत तर दुस-या दिवशी राज्यसभेत उत्तर देणार आहेत. यावेळी विरोधी पक्षातील 235 खासदारांचं नेतृत्त्व हे राहुल गांधी करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे यावेळी विरोधक नीट परीक्षा, वारंवार रद्द होणा-या परीक्षा, शेतकरी प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवरून संसदेत सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.