Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेनं झेपावताच संपूर्ण देशात एकच जल्लोष

Sayali Patil Fri, 14 Jul 2023-2:59 pm,

Chandrayaan-3 Launch Countdown Live: एका ऐतिहासिक उड्डाणासाठी इस्रो सज्ज झालीय. आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 अंतराळात झेप घेणार आहे.

Chandrayaan-3 Launch Countdown Live: भारतातून अतिशय ऐतिहासिक अशा चांद्रयान मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आज असून, अखेर असंख्य महत्त्वाकांक्षांच्या जोडीनं चांद्रयान 3 अवकाशात झेपावणार आहे. त्यामुळं फक्त भारतच नव्हे, तर संपूर्ण अंतराळ क्षेत्राची या मोहिमेवर नजर असणार आहे. इथं आपण या मोहिमेतील सविस्तर माहिती आणि थेट प्रक्षेपण पाहू शकणार आहोत. 


 

Latest Updates

  • Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण होताच शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचा उत्साह शिगेला... पाहा त्या क्षणाची दृश्य. 

  • Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान 3 अवकाशाच्या दिशेनं झेपावताच इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी चांद्रयानाच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत या मोहिमेत सहभागी असणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांची ओळख करून दिली. यावेळी चांद्रयान 3 मोहिमेच्या प्रमुखपदी मोहन कुमार यांच्या प्रयत्नांचं सोमनाथ यांनी कौतुक केलं. 

     

  • Chandrayaan-3 Launch Countdown Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून जागतिक स्तरावरील अनेक विद्वान आणि अभ्यासकांनी या मोहिमेवर लक्ष केंद्रीत करत असतानाच अखेर शुक्रवार 14 जुलै 2023 ला Chandrayaan 3 अवकाशात झेपावलं आणि या यानासह भारताच्या असंख्य महत्त्वाकांक्षाही झेपावल्या. 

  • Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान उड्डाणासाठी उरली फक्त काही मिनिटं, पाहा इस्त्रोमध्ये नेमकं कसं वातावरण आहे... 

  • Chandrayaan-3 Launch Countdown Live:  कुठे पाहता येणार चांद्रयानाचं लाई उड्डाण? यासाठी इस्त्रोनं एक लिंक जारी केली आहे. जिथं तुम्ही घरबसल्या प्रक्षेपण स्थळावरील दृश्य आणि उत्सुकता पाहू शकता 

  • हेसुद्धा वाचा : Chandrayaan 3 Launch Date: चंद्रयान-3 च्या प्रक्षेपणासाठी काऊंटडाऊन सुरू, 14 जुलै हीच तारीख का निवडली? पाहा Video

  • Chandrayaan-3 Launch Countdown Live:  इस्त्रोच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देत ही मोहिम एक मैलाचा दगड ठरेल असं ते म्हणाले. 

  • Chandrayaan-3 Launch Countdown Live:  इस्त्रोतील माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी चांद्रयान 3 मोहिम भारतासाठी बाजी पलटणालं पाऊल ठरू शकते अशी प्रतिक्रिया दिली आहे. चार वर्षांनंकर भारत पुन्हा या मोहिमेत प्रयत्नशी असून मोहिम यशस्वी झाल्यास हा ऐतिहासिक टप्पा असेल असं ते म्हणाले. 

  • Chandrayan 3 Launch: आज भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. संपूर्ण जगाचं लक्ष आजा भारताकडे असणार आहे. भारतातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून (Satish Dhavan Space Centre) दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 चं लाँचिंग होणार आहे. मोहिमेसाठी 615 कोटी खर्च करण्यात आले आहेत. जवळपास 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिग करेल. चांद्रयान-3 च्या लँडिगची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ ऋतु करिधाल (Ritu Karidhal) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ऋतु करिधाल चांद्रयान 3 च्या मिशन डायरेक्टर म्हणून भूमिका निभावत आहेत. 

    बातमीच्या लिंकसाठी येथे क्लिक करा 

  • Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान मोहिमेत महिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसणार आहेत. तब्बल 54 महिला इंजिनिअर आणि टेक्निशिअननी या मोहिमेक मोलाचं योगदान दिलं आहे. चांद्रयान 2 प्रमाणंच चांद्रयान 3 मध्येसुद्धा सॉफ्ट लँडिंग एक महत्त्वाचं आवाहन आहे. त्यामुळं या मोहिमेकडे सर्वांचं लक्ष आहे. 

     

  • Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान 3 ही भारताची तिसरी चांद्रयान मोहीम आहे. दुसऱ्यांदा भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅण्डींगचा प्रयत्न करणार आहे. तसेच चंद्रयान-3 मधील रोव्हर चंद्रावर उतरवून तेथील माहिती मिळवण्याचा भारतीय शास्त्रज्ञांचा प्रयत्न असेल.

    हेसुद्धा वाचा : ISRO च्या Chandrayaan-3 मोहिमेसाठी किती खर्च झाला माहितीये का?

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

     

  • Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करेल तेव्हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही किमया करणारा भारत जगातला चौथा देश ठरेल.

     

  • Chandrayaan-3 Launch Countdown Live: सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरचा प्रवास करुन चांद्रयान-3 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्रावर उतरेल. चांद्रयान-3 मिशन भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. 

     

  • Chandrayaan-3 Launch Countdown Live: हे चांद्रयान देशातल्या कोट्यवधी लोकांची आशा बनून निधड्या छातीनं श्रीहरीकोटात उभं आहे. या लॉन्चिंगसाठी LVM-3-M4 रॉकेटचा वापर केला जात आहे. 

     

  • Chandrayaan-3 Launch Countdown Live: चांद्रयान 3 ची लाँचिंगची तयारी पूर्ण झाली आहे. तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची रंगीत तालीमही पूर्ण झालीय आणि रंगीत तालीम 100 टक्के यशस्वी ठरलीय. 

  • Chandrayaan-3 Launch Countdown Live: श्रीहरीकोटामध्ये सर्वात महत्त्वाचं काऊंटडाऊन सुरू झालंय. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन हे प्रक्षेपण होणार आहे. 

     

  • Chandrayaan-3 Launch Countdown Live: प्रचंड मेहनत आणि प्रयत्नांनंतर अखेर शुक्रवारी 14 जुलै 2023 (आज) दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3  अंतराळात झेप घेणार आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link