Jammu Kashmir Vidhan Sabha Election Result LIVE: ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री, फारुख अब्दुल्लांनी केली घोषणा

Tue, 08 Oct 2024-2:53 pm,

Jammu Kashmir Vidhan Sabha Election Results News in Marathi: जम्मू काश्मीरमध्ये 90 जागांवर घेण्यात आलेल्या निवडणुकीचे निकाल आज (मंगळवार 8 ऑक्टोबर 2024) रोजी पार पडणार आहेत.

Jammu Kashmir Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 Latest News in Marathi: संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळात बऱ्याच घडामोडी घडत असतानाच जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागून राहिलं आणि आता या निवडणुकीच्या निकालात जनतेचा कौल कोणाला मिळतो यावरून J & K मध्ये नेमकं कसं चित्र असेल हे स्पष्ट होणार आहे. 


 

Latest Updates

  • Breaking News : ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री, फारुख अब्दुल्लांनी केली घोषणा 

    जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल 8 ऑक्टोबवर रोजी जाहीर होतोय. फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री म्हणून ओमर अब्दुल्ला यांच्या नावाची घोषणा केली आहे. फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले की, केंद्रातील भाजप सरकारने 5 ऑगस्टला घेतलेला निर्णय जनतेला मान्य नाही हे निकालातून दिसल. लोकांनी आपला स्पष्ट  जनादेश दिला आहे

  • Jammu Kashmir Vidhan Sabha Election Result LIVE : तनवीर सादिक विजयी.... 

    नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सादिक तनवीर यांना अधिकृतपणे जदीबल विधानसभा क्षेत्रातून विजयी घोषित करण्यात आलं आहे. 

  • Jammu Kashmir Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 News in Marathi: गुरेजमध्ये कोणाचा विजय? 

    जम्मू काश्मीर विधानसभेत गुरेज मतदार संघातून नॅशनल कॉन्फरन्सच्या नजिर अहम द खान यांनी 1132 मतांनी भाजपच्या फकीर मोहम्मद खान यांना पराभूत केलं. 

  • Jammu Kashmir Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 News in Marathi: जम्मू काश्मीरमध्ये भाजपचा पहिला विजय 

    जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये मतमोजणी सुरू असतानाच बसोहली मतदारसंघातून दर्शन कुमार विजयी झाल्याचं वृत्त आहे. त्यांनी काँग्रेसच्या लाल सिंह यांना 16034 मतांनी पराभूत केलं. 

  • Jammu Kashmir Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 News in Marathi: मी पराभव मान्य करते... - इल्तिजा मुफ्ती

    मी जनमत मान्य करते असं म्हणत मेहबुबा मुफ्ती यांच्या मुलीनं, इल्तिजा मुफ्तीनं पराभव स्वीकारला आहे. बिजबेहरा इथून नागरिकांच्या मिळालेल्या प्रेमाबद्दल तिनं आभार व्यक्त केले. याशिवाय आपल्या पक्षाच्या वतीनं प्रचारासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे ही तिनं आभार मानले. 

  • Jammu Kashmir Vidhan Sabha Election Result LIVE : जम्मू काश्मीरमध्ये कोण आघाडीवर? 

    रविंद्र रैना, नौशेरा- भाजप- आघाडी 
    ओमर अब्दुल्ला, बडगाव- एनसी- आघाडी
    गुलाम मीर, डोरु- काँग्रेस - आघाडी 

  • Jammu Kashmir Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 News in Marathi: सुरुवातीच्या कलांमध्ये जम्मू काश्मीरवर काँग्रेसची पकड 

    भाजपसाठी पुढील वाट बिकट... काँग्रेसकडे मुसंडी मारण्याची संधी. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसची 46 जागांवर आघाडी तर, भाजप 27 जागांवर आघाडीवर. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसची मोठी आघाडी. कलानुसार काँग्रेसची बहुमताच्या दिशेनं वाटचाल

     

  • Jammu Kashmir Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 News in Marathi: काँग्रेस+ ची बहुमताच्या दिशेनं वाटचाल 

    जम्मू काश्मीरमधील सर्व कल हाती आले असून, यामध्ये काँग्रेस + ला बहुमत मिळताना दिसत आहे. काँग्रेस + ला 45, भाजपला 30, पीडीपी 3 आणि इतर पक्षांना 12 जागांवर आघाडी मिळाल्याचं स्पष्ट होत आहे. 

  • Jammu Kashmir Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 News in Marathi: सत्ता कायमस्वरुपी नसते... 

  • Jammu Kashmir Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 News in Marathi: काँग्रेसकडून भाजपला तगडं आव्हान 

    जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला 14 हून अधिक जागांवर आघाडी मिळाली असून, इथं काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यामध्ये युती असल्यानं आता या युतीचा कितपत फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

  • Jammu Kashmir Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 News in Marathi: सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस, भाजपमध्ये 'काँटे की टक्कर' 

    जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिले कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसकडून भाजपला तोडीस तोड आव्हान मिळताना दिसत आहे. 

  • Jammu Kashmir Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 News in Marathi: जम्मू काश्मीरमध्ये आघाडीवर कोण? 

    मतमोजणीच्या पहिल्या कलांमध्ये भाजप 3, काँग्रेस 2 आणि 3 जागांवर अपक्षांची आघाडी. 

  • Jammu Kashmir Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 News in Marathi: मतमोजणीआधी ओमर अब्दुल्ला यांची सूचक पोस्ट 

    नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि गांदरबल, बडगाम मधून पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवणाऱ्या ओमर अब्दुल्ला यांनी X च्या माध्यमातून एक सूचक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीसाठी, निकालासाठी सज्ज असणाऱ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. आपण एक चांगली लढाई लढलो आणि आता त्याचं निकालांमध्ये रुपांतर होणार आहे, असं त्यांनी म्हटलं. 

  • Jammu Kashmir Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 News in Marathi: मतपेटीत बंद 'या' महत्त्वाच्या जागा आणि नेत्यांचं भविष्य 

    उमर अब्दुल्ला– गांदरबल, बड़गाम
    इल्तिजा मुफ्ती– श्रीगुफवारा-बिजबेहारा
    रविंदर रैना– नौशेरा
    तारीक हमीद कर्रा– सेंट्रल शालटेंग
    अल्ताफ बुखारी– चन्नापोरा
    सज्जाद गनी लोन– कुपवाड़ा, हंदवाड़ा
    एमवाई तारिगामी– कुलगाम
    शगुन परिहार– किश्तवाड़
    सर्जन बरकाती- बीरवाह, गांदरबल
    वहीद उर रहमान पारा – पुलवामा

  • Jammu Kashmir Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 News in Marathi: कोण बाजी मारणार? 

    1 ऑक्टोबर रोजी जम्मू काश्मीरमधील सर्व विधानसभा जागांसाठीचं मतदान पार पडलं. ज्यानंतर आता या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठीच सारे आतुर झाले आहेत. अनुच्छेद 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक पार पडली असून, येथील राजकीय परिस्थिती बरीच बदलल्याचं पाहायला मिळत आहे. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link