PM Modi Ayodhya Visit Live : संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहतंय - पंतप्रधान मोदी

Sat, 30 Dec 2023-3:14 pm,

PM Modi Ayodhya Visit Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला येत आहेत. श्री रामजन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात 22 जानेवारी रोजी राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी त्यांच्या दौऱ्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ, महामार्ग, रेल्वे स्टेशन यासह अनेक मोठ्या प्रकल्पांना भेट देतील.

PM Modi Ayodhya Visit Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अयोध्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी सुमारे 16 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प भेट देणार आहेत. तसेत अयोध्येतील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुनर्विकसित रेल्वे स्थानकासह अन्य प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यासह दोन अमृत भारत आणि सहा नवीन वंदे भारत गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. यासोबत पंतप्रधान अयोध्येतील चार नव्याने पुनर्विकसित, रुंदीकरण आणि सुशोभित रस्त्यांचे उद्घाटन करतील. 

Latest Updates

  • PM Modi Ayodhya Visit Live Updates : 550 वर्षे वाट पाहिली, अजून काही दिवस थांबा - पंतप्रधान मोदी

    22 जानेवारीच्या कार्यक्रमाबाबत पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना विशेष विनंती केली. पंतप्रधान म्हणाले, मी 140 कोटी देशवासियांना प्रार्थना करत आहे की, 22 जानेवारीला जेव्हा भगवान श्रीराम अयोध्येत विराजमान आहेत, तेव्हा त्यांनी घरोघरी श्री रामज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी. 22 जानेवारीची संध्याकाळ भारतभर उजळून निघावी. त्या दिवशी अयोध्येला येणे शक्य नाही. अयोध्येला पोहोचणे सर्वांनाच अवघड आहे. हात जोडून नमस्कार करून, सर्व राम भक्तांना विनंती आहे की 22 जानेवारीला म्हणजे 23 जानेवारीनंतर औपचारिक कार्यक्रम झाल्यावर अयोध्येत यावे. 22 जानेवारीला अयोध्येला यायचे ठरवू नका. आम्ही रामभक्त प्रभू रामाला कधीच त्रास देऊ शकत नाही. 550 वर्षे वाट पाहिली. अजून काही दिवस थांबा.

  • PM Modi Ayodhya Visit Live Updates : मी भारतातील लोकांचा पुजारी आहे - पंतप्रधान मोदी

    आज संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा स्थितीत अयोध्यावासीयांमध्ये हा जल्लोष आणि उत्साह स्वाभाविक आहे. मी भारताच्या मातीच्या प्रत्येक कणाचा आणि भारतातील लोकांचा पूजक आहे आणि मलाही तुमच्यासारखाच जिज्ञासू आहे, असेही 
    पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • PM Modi Ayodhya Visit Live Updates : मी भारतातील लोकांचा पुजारी आहे - पंतप्रधान मोदी

    आज संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा स्थितीत अयोध्यावासीयांमध्ये हा जल्लोष आणि उत्साह स्वाभाविक आहे. मी भारताच्या मातीच्या प्रत्येक कणाचा आणि भारतातील लोकांचा पूजक आहे आणि मलाही तुमच्यासारखाच जिज्ञासू आहे, असेही 
    पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • PM Modi Ayodhya Visit Live Updates : देशातील चार कोटी गरीबांना कायमस्वरूपी घरे मिळाली - पंतप्रधान मोदी

    अयोध्या धाम जंक्शन आणि अयोध्या विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधित केले. राम मंदिराच्या अभिषेक संदर्भात 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील स्वागतासाठी लोकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, देशातील चार कोटी गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत.

  • PM Modi Ayodhya Visit Live Updates : पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन केले

    पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन केले. विमानतळाचा पहिला टप्पा 1450 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित करण्यात आला आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असेल.

  • PM Modi Ayodhya Visit Live Updates : पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी पोहोचले पंतप्रधान मोदी

    अयोध्या स्थानकावरून परतत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी पोहोचले. पंतप्रधान अचानक लाभार्थी धनीराम मांझी यांच्या घरी गेले होते. तेथे त्यांची भेट धनीराम मांझी यांच्याशी झाली. धनीराम मांझी यांच्या घरी पीएम मोदी अचानक आल्याने त्यांच्या शेजाऱ्यांनाही धक्का बसला. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्यात उज्ज्वला लाभार्थीच्या घरी जाऊन त्यांच्या घरी चहा घेतला. त्या पीएम उज्ज्वला योजनेच्या 10 कोटीव्या लाभार्थी आहेत.

  • PM Modi Ayodhya Visit Live Updates : पंतप्रधान मोदींनी देशाला भेट दिल्या 8 ट्रेन 

    पंतप्रधान मोदींनी अयोध्येत हिरवा झेंडा दाखवून देशाला 8 ट्रेनची भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली, अमृतसर-नवी दिल्ली, कोईम्बतूर-बंगलोर, मंगळुरू-मडगाव, जालना-मुंबई आणि अयोध्या-आनंद विहार टर्मिनल दरम्यान 6 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या भेट दिल्या. यासोबतच पंतप्रधान मोदींनी अयोध्या-दरभंगा आणि मालदा टाउन-बंगळुरू दरम्यान 2 अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

  • PM Modi Ayodhya Visit Live Updates : पंतप्रधान मोदींनी अयोध्या धाम स्थानकाचे उद्घाटन केले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी पंतप्रधानांसोबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते. यासोबत अयोध्या धाम रेल्वे स्थानकावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन नवीन अमृत भारत ट्रेन आणि सहा नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये महाराष्ट्रातील जालना ते मुंबई या वंदे भारत ट्रेनचाही समावेश आहे.

  • PM Modi Ayodhya Visit Live Updates : अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर पोहोचले पंतप्रधान मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्याधाम रेल्वे स्थानकावर पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करणार आहेत. अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी सर्वप्रथम तेथे पाहणी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या धाम रेल्वे स्टेशन सुमारे 241 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. अयोध्या धाम रेल्वे स्थानक सर्व आधुनिक सुविधांनी युक्त आहे.

  • PM Modi Ayodhya Visit Live Updates : विमानतळावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी केले पंतप्रधान मोदींचे स्वागत 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला पोहोचले आहेत. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

  • PM Modi Ayodhya Visit Live Updates : असा असेल पंतप्रधान मोदींच्या रोड शोचा मार्ग

    पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता अयोध्येला पोहोचतील. ते दिल्लीहून अयोध्येला रवाना झाले आहेत. अयोध्येला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी अयोध्या विमानतळावरून धरमपथवर येतील आणि सकाळी 10.30 वाजता रोड शोला सुरुवात करतील. हा रोड शो धरमपथ-रामकथा पार्क-लता मंगेशकर चौक-तुलसी उद्यान-हनुमानगढ़ी चौक-बिर्ला धर्मशाळा-श्री राम चिकित्सालय मार्गे अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

  • PM Modi Ayodhya Visit Live Updates : या प्रकल्पांचे उद्धाटन आणि पायाभरणी करणार पंतप्रधान मोदी

    - अयोध्या धाम जंक्शनवरून 6 वंदे भारत आणि 2 अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार
    -आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करणार, जाहीर सभेला संबोधित करणार.
    -राम पथ (सहदतगंज ते नवीन घाट)
    - भक्ती पथ (अयोध्या मुख्य रस्त्यापासून हनुमान गढी मार्गे श्री रामजन्मभूमीपर्यंत)
    -धर्म पथ (NH-27 ते नया घाट जुन्या पुलापर्यंत)
    -राजर्षी दशरथ स्वायत्त राज्य वैद्यकीय महाविद्यालय
    -NH-27 बायपास, महोब्रा बाजार मार्गे तेढी बाजार श्री रामजन्मभूमीपर्यंत 4 लेन रस्ता.
    -महर्षी अरुंधती पार्किंग आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स
    - अयोध्या-सुलतानपूर राष्ट्रीय महामार्ग-330 ते विमानतळापर्यंत 4 लेन रस्ता.
    -जौनपूर-अयोध्या-बाराबंकी रेल्वे लाईन प्रकल्पांतर्गत चार विभागांचे दुहेरीकरण.

  • PM Modi Ayodhya Visit Live Updates : सहा ट्रेनला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

    पंतप्रधान मोदी आज अयोध्येत सहा नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, अमृतसर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, कोईम्बतूर-बेंगलोर कॅन्ट वंदे भारत एक्सप्रेस, मंगलोर-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि अयोध्या-आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेस यांचा समावेश आहे. 

  • PM Modi Ayodhya Visit Live Updates : अयोध्येत पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत 

    22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानक आणि नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. अयोध्येला या प्रकल्पांची भेट देण्यापूर्वी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत होणार आहे. अयोध्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींच्या विशेष स्वागताचीही तयारी सुरू आहे. अयोध्येतील मार्ग फुलांनी सजवण्यात आले आहेत. तर शंखध्वनी आणि डमरू वादनाने पंतप्रधानांचे स्वागत करण्यात येणार आहे. अयोध्येतील प्रत्येक कोपऱ्यात सुरक्षा व्यवस्था पहायला मिळत आहे. लोकनर्तक लोकसंस्कृतीच्या सूर आणि संगीतावर नाचताना दिसत आहेत.

  • PM Modi Ayodhya Visit Live Updates : अयोध्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींची पोस्ट

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येत स्वागत आणि सत्कार स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी अयोध्या दौऱ्यापूर्वी एक्सवर पोस्ट देखील केली आहे. "आमचे सरकार जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि भगवान श्री रामाची नगरी असलेल्या अयोध्येचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी कटिबद्ध आहे. या दिशेने मी नव्याने बांधण्यात आलेल्या विमानतळाचे आणि पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करणार आहे. यासोबतच मला आणखी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्याचा बहुमान मिळणार आहे, ज्यामुळे अयोध्या आणि उत्तर प्रदेशसह देशातील अनेक भागात माझ्या कुटुंबातील सदस्यांचे जीवन सुसह्य होईल," असे पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link