मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांच्या लॉकडाऊनची संपूर्ण जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे. मुख्यमंत्री आपल्या राज्याबाबतचा निर्णय घेणार आहेत. तसेच लॉकडाऊनच्या चौथ्या चरणात काही प्रमाणात बदल करण्यात येणार आहे. ग्रीन, ऑरेंज झोनमधील काही नियम शिथिल करण्यात येणार आहेत. यावेळी धार्मिक स्थळांबाबत नवे नियम लागू करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंध्र प्रदेश सरकारने मंदिर खुले करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु दर्शन घेण्यासाठी कडक नियम केले आहेत. त्यामुळे मंदिरातील परंपरा काही महिन्यासाठी बदलू शकते. आंध्र प्रदेशातील मंदिरात जाण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. तर कर्नाटकातील साडेतीन हजार मंदिरात चरणामृत, प्रसाद वर बंदी घालण्याचा विचार सरकार करत आहे. तिरूपती आणि श्रीशैलम मंदिरात व्यवस्थापनाने सोशल डिस्टन्सिंग संदर्भात सराव सुरू केला आहे.


त्याशिवाय गुरूद्वारामध्ये लंगर आणि चर्च मधील संडे प्रेयर मध्ये काही बदल करत सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येणार आहे. केरळमध्ये चर्चमध्ये लग्नात जास्त लोकांना सहभागी होता येणार नाही.


मंदीरांसाठी काय नियम?


- मंदिरात २४ दिवसापूर्वी ऑनलाईन परवानगी घ्यावी लागेल.
- मॅसेजद्वारे श्रद्धाळूंना दर्शनाची वेळ कळविली जाईल. त्यानुसार टाईमस्लाॅट तयार करण्यात येणार आहे.
- श्रद्धाळूंना हार, फूल आणि प्रसाद आणता येणार नाही.
- मंदिरातील पुजारी चरणामृत आणि प्रसाद देऊ शकत नाही. 
- एका तासात जास्तीत जास्त २५० श्रद्धाळू दर्शन घेऊ शकतात. मर्यादा ठेवण्यात आली आहे.
- दर्शनाला जाताना आधार कार्ड न्यावं लागणार आहे.
- गाभा-यात जाऊन दर्शन घेता येणार नाही. कारण गाभा-यात जागा कमी असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग नियंमांचे पालन होणे शक्य नाही.
- सकाळी ६ ते संध्याकाळी ६ दर्शन असेल.
- पुजा-यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे आहे
- दर्शनासाठी लांब रांगा लावल्या जाणार नाही
- मंदिरात पालखी किंवा इतर वाहन नेण्यास मनाई.