नवी दिल्ली : देशात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. तर या दरम्यान बस सेवा, रेल्वे आणि विमानसेवा संपूर्ण बंद असावी अशी मागणीही अरविंद केजरीवाल यांनी केलीय. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू झाली तर कोरोनाचे संकट वाढेल अशी भिती बैठकीत व्यक्त करण्यात आली. यावेळी मोदी यांनी सांगितले, आपण सगळे सोबत मिळून कोरोनाला हरवू या. मी २४ तास उपलब्ध आहे.


लाॅकडाऊन ३० एप्रिलपर्यंत महाराष्ट्र, दिल्लीत वाढणार



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. देशात लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात ही चर्चा झाली. या व्हीडीओ कॉन्फरन्सला पंतप्रधान नरेंद्र मोदी तोंडाला मास्क लावून सहभागी झाले होते. या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा या निवासस्थानातून सहभागी झाले. त्यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.



व्हिडिओ कॉन्फरन्स, कोण काय म्हणाले?


- ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन वाढवावा
- बस, रेल्वे, विमानसेवा बंदच ठेवावी
- पंतप्रधान मोदींच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा सूर
- उध्दव ठाकरे : ३० एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन वाढवावा.
- अरविंद केजरीवाल : बस, रेल्वे आणि विमानसेवा सुरू करू नये. वाहतूक व्यवस्था खुली केली तर संसर्ग पसरेल. 
- अमरिंदर सिंग : जास्तीत जास्त टेस्टींग होणे गरजेचे आहे. केंद्राने टेस्टींग किट तात्काळ उपलब्ध करून द्यावे. राष्ट्रीय स्तरावर लाॅकडाऊन निर्णय घ्यावा.
- ममता बॅनर्जी : केंद्र सरकारने तात्काळ रिलीफ पॅकेज जाहीर करावं. राज्य सरकारला मदतीची आवश्यकता आहे.
- नरेंद्र मोदी : सोबत मिळून कोरोनाला हरवू या. मी २४ तास उपलब्ध आहे.