गडचिरोलीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप थेट लढत
गडचिरोलीमध्ये कोणामध्ये लढत?
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत गडचिरोली मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत असणार आहे. हा नक्षलवादी भाग मानला जातो. येथे सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये अनेक एनकाउंटर होत असतात. या मतदारसंघातून काँग्रेसने नामदेव उसेंडी यांनी उमेदवारी दिली आहे. उसेंडी हे २०१४ मध्ये आमदार होते. गडचिरोलीमध्ये त्यांचा भाजपचे अशोक नेते यांनी पराभव केला होता. भाजपने पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे.
६ विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्रातील नक्षलवादी भाग मानल्या जाणाऱ्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ २००८ च्या आधी फक्त चिमूर लोकसभा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात होता. त्यानंतर तो गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ झाला. येथून ६ आमदार निवडून जातात. अमगाव, अरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी आणि चिमूर हे ६ विधानसभा मतदारसंघ या लोकसभा क्षेत्रात येतात. येथे सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
काँग्रेसचा दबदबा
गडचिरोली-चिमूर मतदारसंघ १९६७ मध्ये चिमूर मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला होता. तेव्हा रामचंद्र मार्तंड येथून खासदार होते. २०१४ पर्यंत काँग्रेसने येथे ७ वेळा निवडणूक जिंकली आहे. तर भाजपने येथे ५ वेळा विजय मिळवला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अशोक नेते यांना ५.३५ लाख मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या नामदेव उसेंडी यांना २.९९ लाख मतं मिळाली होती.