नवी दिल्ली : भोपाळच्या भाजपा उमेदवार वादग्रस्त प्रज्ञा ठाकूर यांना निवडणूक आयोगाने चपराक दिली आहे. पुढचे 72 तास प्रचार न करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे आणि बाबरी मशीद प्रकरणी वादग्रस्त विधान केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रज्ञा यांच्या वक्तव्याची आयोगाने कठोर निंदा केली आहे. भविष्यात अशा चुका करु नका अशी सक्त ताकीद प्रज्ञा यांना देण्यात आली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहीद करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्या बाबत प्रज्ञा यांनी मागितल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही प्रज्ञा यांचे हे वक्तव्य अयोग्यच आहे यावर निवडणूक आयोग ठाम आहे. त्यामुळे दोन मे सकाळी सहा वाजल्यापासून पुढचे 72 तास प्रज्ञा यांच्यावर बंदी लागू झाली आहे. याप्रकरणी प्रज्ञा ठाकूर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी या निर्णयाचा सन्मान करते असे त्या म्हणाल्या. 



माझ्या शापामुळे करकरे 26 / 11 च्या मुंबई हल्ल्यात मारले गेले. कारण मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात एटीएसने मला खूप यातना पोहोचवल्याचे प्रज्ञा यांनी म्हटले. त्या एवढ्याच वादग्रस्त विधानावर थांबल्या नाहीत. तर 1992 मध्ये अयोध्येत बाबरी मशीद तोडण्यात आपले योगदान असण्यावर गर्व असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.