अमरावती : लोकसभा निवडणूक 2019 च्या पहील्या टप्प्यातील मतदानास सुरुवात झाली आहे. आंध्र प्रदेशच्या 25 लोकसभा जागांव्यतिरिक्त 175 सदस्यीय विधानसभा जागांसाठी मतदान होत असताना एक विचित्र घटना समोर आली आहे. जन सेना पार्टीच्या एका उमेदवाराने स्वत: चा राग ईव्हीएम मशिनवर काढला. त्याने इलेक्ट्रॉनिक वेंडीग मशिन (ईव्हीएम) उचलून जोरात जमिनीवर आपटली. यानंतर पोलिसांनी ईव्हीएम मशिन सोबत छेडछाड केल्याचा आरोपाखाली त्याला अटक केली. मधुसूदन गुप्ता असे या आरोपीचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनंतपूर जिल्ह्याच्या गुंतकल विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर ईव्हीएम आपटण्याचा प्रकार घडला. मतदान केंद्रात मत देण्यासाठी गेलेल्या मधुसुदन गुप्ताला ईव्हीएम मशीनवर विधानसभा आणि संसदीय क्षेत्रांची नावेच दिसली नाहीत. यावरुन तो मतदान कर्मचाऱ्यांवर नाराज झाला. ही ईव्हीएम मशिन बोगस आहे आणि पूर्णपणे चुकीची आहे असे त्याने कर्मचाऱ्यांना म्हटले. असा अन्याय करुन निवडणूक करणार का ? असा प्रश्न त्याने उपस्थित केला. त्यानंतर रागाने लाल झालेल्या गुप्ताने ईव्हीएम उचलून ती लादीवर आपटली. यामध्ये मशिनचे नुकसान झाले. यानंतर गुप्ताला तात्काळ अटक करण्यात आली. 



आंध्रप्रदेशमध्ये गुरूवारी लोकसभाचे 25 व्या विधानसभा 175 जागांवर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली. राज्यात एकूण 3,93,45,717 मतदार आहेत. यामध्ये 1,94,62,339 पुरूष तर 1,98,79,421 महिला आणि 3,957 ट्रांसजेंडर मतदार आहेत. यामध्ये 18-19 वयोगटाचे 10.5 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करत आहेत.