वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीत सकाळी बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझा बूथ सर्वात मजबूत हा संदेश देतानाच महिलांचं मतदान ५ टक्क्याने अधिक व्हावं अशी अपेक्षा त्यांनी  व्यक्त केली. विरोधी पक्षांचा प्रत्येक उमेदवार हा आदरणीय आहे, त्यांच्याशी वैर नाही, बंधुभाव बाळगा असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मला शिव्या देणाऱ्यांची पर्वा करत नाही, शिव्यांच्या चिखलातून कमळ फुलवतो असं मोदी म्हणाले.  यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर काल पुणे विमानतळावरून वाराणसीला गेले. सकाळी १० वाजता नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर वाराणसी जिल्हाधिकारी कार्यलयात उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यावर संध्याकाळी मोदी आणि उद्धव ठाकरे मुंबईत पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. मुंबईतल्या बांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानात आज महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी वाराणसीत 7 कि.मीचा रोड शो केला होता. या रोड शो नंतर त्यांनी गंगा आरतीमध्ये देखील सहभाग दर्शवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुक वाराणसी आणि वडोदरा या दोन मतदार संघातून लढली होती. दोन्ही जागांवर जिंकल्यानंतर त्यांनी वडोदराची जागा सोडली होती.