नवी दिल्ली : आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केलीय. या निवडणुकीत काँग्रेस अडीचशे जागा लढवण्याची शक्यता आहे, अशी माहिती झी मीडियाला सूत्रांनी दिलीय. याशिवाय काँग्रेसने महाआघाडीसाठी ब्लू प्रिंटही तयार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. २०१४ साली जिंकलेल्या सर्वच्या सर्व ४४ जागा स्वबळावर लढणार असल्याचे बोललं जातंय. बाकी ठिकाणी काँग्रेस आघाडी करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मात्र ज्या २२४ ठिकाणी २०१४ साली काँग्रेस दुसऱ्या स्थानी राहिली होती त्या जागा जिंकण्यासाठी काँग्रेस जोर लावणार आहे. यांत काही अडचणी आल्यास काँग्रेस मित्रपक्ष आणि छोट्या पक्षांना विधानसभेत जादा जागा देऊन एखादा फॉर्मुला तयार केला जाऊ शकतो अशी माहिती मिळतेय.