नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. आज सात राज्यात ५१ मतदारसंघात मतदान होते आहे. मतदानासाठी मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्यात. केंद्रीय मंत्री आणि लखनऊमधील भाजपा उमेदवार राजनाथ सिंह यांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभेच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हा, कुणीही मतदानापासून वंचित राहू नका असं आवाहन नागरिकांना केले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, दिल्लीच्या हजारीबागमध्ये माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी जनतेला अधिकाधिक संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलंय. त्यांचे पुत्र आणि केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा झारखंडमधून निवडणूक लढवत आहेत. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी जयपूरमध्ये सहकुटुंब मतदान केले.  


सकाळी ९ वाजेपर्यंत ७ राज्यात सरासरी ११.६८ % मतदान


मध्य प्रदेश –  ११. ४३  %
उत्तर प्रदेश – ९.८२ %
बिहार – ११.५१  %
राजस्थान – १३.३७ %
जम्मू-काश्मीर – ०.८० %
झारखंड 1१३.४६ %
पश्चिम बंगाल १५.१९ %
बिहारमधील गोपाळपूरमधील नयागाव मतदानकेंद्रावर EVM मशीनची तोडफोड
 



 उत्तर प्रदेशातल्या १४, राजस्थानातल्या १२,  मध्य प्रदेश ,पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी ७, बिहारमध्ये ५, झारखंडमध्ये ४ तर जम्मू काश्मीरमध्ये लडाख आणि अनंतनाग लोकसभा मतदारसंघातसाठी पुलवामा, शोपिया या ठिकाणी मतदान होतंय. एकूण ६७४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून यावेळी ८ कोटी ७५ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 



पाचव्या टप्प्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील रायबरेली व अमेठी या मतदारसंघांचा समावेश आहे. यावेळी  यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाच्या स्मृती इराणी यांनी आव्हान उभं केलंय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, 'यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अर्जुन राम मेघवाल, राज्यवर्धनसिंह राठोड, साध्वी निरंजन ज्योती, जयंत सिन्हा आदींच्या भवितव्य  आज मतपेटीत बंद होणार आहे.