Lok Sabha Election: 2024 च्या निवडणुकीच्या नव्या survey ने मोदी-शाह यांची डोकेदुखी वाढली! या तीन राज्यात असे निकाल
Survey On Lok Sabha Election : देशात भाजप एक नंबरचा पक्ष असला तरी त्याला अनेक ठिकाणी फटका बसण्याची शक्यता नव्या सर्वेक्षणामुळे आहे. यामुळे एनडीत तणाव वाढू शकतो. तीन मोठ्या राज्यांच्या संदर्भात जे सर्वेक्षण समोर आले आहे त्यात यूपीएला जणाधार मिळत असल्याचे दिसत आहे.
Lok Sabha Election Survey : आगामी लोकसभा निवडणुकीची काही राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. ( Political News ) लोकसभा 2024 च्या (Lok Sabha Election 2024) निवडणुकीबाबत एक नवीन सर्वेक्षण समोर आले आहे. यात भाजपला फटका बसताना दिसून येत आहे. त्यामुळे भाजप (BJP) नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. सी-व्होटर आणि इंडिया टुडेचे सर्वेक्षण तीन मोठ्या राज्यांत भाजपला फटका बसेल. तर यूपीएच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढण्याचा अंदाज आहे. ( Political News in Marathi )
भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी एनडीए सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी खडतर प्रयत्न करत असले तरी नव्या सर्वेक्षणामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होणार आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या तीन राज्यांपैकी 2014 मध्ये भाजपची इतर पक्षांशी असलेली युती तुटली आहे. याचा परिणाम भाजपच्या कामगिरीवर होऊ शकतो. त्याचबरोबर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडीला याचा फायदा होऊ शकतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात या सर्वेक्षणात मोठे भाकीत करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात काय असणार राजकीय स्थिती?
महाराष्ट्रात राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे.(Maharashtra Politics) शिवसेनेत मोठे दुफळी पडली असून शिवसेना ठाकरे यांच्या हातून निसटली आहे. असे असले तरी शिंदे गटासोबत भाजपने युती केली तरी त्याचा फायदा हा भाजपला होत नसल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक 2024 साठी घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 1.39 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या तीन मोठ्या राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यूपीएची जादू चालणार असल्याचे संकेत सर्वेक्षणात मिळाले आहेत.
सर्वेक्षणानुसार, यावेळी महाराष्ट्रात यूपीए आघाडीच्या जागा वाढू शकतात. यूपीएला महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 34 जागा मिळू शकतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने महाराष्ट्रात 41 जागा जिंकल्या होत्या. यावेळी महाराष्ट्रात जिथे काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असू शकते, तिथे भाजप आणि एकनाथ शिंदे गट एकत्र असू शकतात.
बिहारमध्ये कोणाला जणाधार मिळणार?
बिहारमध्ये राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला तगडे आव्हान दिले आहे. 100 जागांवर भाजप विधानसभा निवडणुकीत जागा मिळवू शकणार नाही, असे नितीश कुमार म्हणालेत. त्याचवेळी बिहारमध्येही काँग्रेस-आरजेडी आणि जेडीयू आघाडीला जणाधार मिळू शकतो. सर्वेक्षणानुसार यूपीएला यावेळी 40 पैकी 25 जागा मिळू शकतात. त्याचबरोबर एनडीएला मोठा फटका सहन करावा लागू शकतो. गेल्यावेळी येथे भाजप आणि जेडीयू एकत्र होते. 2019 च्या निवडणुकीत एनडीएने येथे 39 जागा जिंकल्या होत्या.
कर्नाटकात यूपीएसाठी आनंदाची बातमी
सर्वेक्षणानुसार, यावेळी भाजप प्रणित एनडीएला कर्नाटकमध्ये मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. मतांची टक्केवारीही कमी होऊ शकते. त्याचबरोबर यूपीएची जादू इथे पाहायला मिळत आहे. यूपीएच्या मतांची टक्केवारी 43 पर्यंत वाढू शकते. येथे यूपीएला 17 जागा मिळू शकतात. मात्र, हे सर्वेक्षण योग्य आहे की नाही, हे लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतरच नक्की कोणाला फायदा होईल, ते समजेल.