Loksabha 2024 Exit Poll : लोकसभा निवडणूक 2024 साठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज देशभरात पार पडलं. चार जूनला निवडणुकीचा लागणार आहे. त्याआधी शनिवारी संध्याकाळपासून एक्झिट पोलचे निकाल यायला सुरुवात होईल. विविध संस्था आणि माध्यमांच्या एक्झिट पोलमधून देशात कोणाची सत्ता येईल याचं अंदाजी चित्र स्पष्ट होईल.   देशात पुन्हा मोदी की राहुल गांधी...? महाराष्ट्रात कुणाची सरशी, मविआ की महायुती...? याचा कौल लक्षात येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्झिट पोल म्हणजे काय?
एक्झिट पोल म्हणजे लोकांनी निवडणुकीत कसे मतदान केलं याचा वर्तवलेला एक अंदाज. मतदार मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या मुलाखतींच्या आधारे, आणि मतदार डेटाशी संबंधित इतर आकड्यांच्या आधारावर एक्झिट पोलची आकडेवारी ठरवली जाते. देशातील काही प्रमुख संस्था यासाठी सर्व्हे करतात. या संस्था मतदानाच्या दिवशी आपले कर्मचारी मतदान केंद्राबाहेर उभे करतात. मतदारांना काही प्रश्न विचारले जातात. म्हणजे देशात कोणता पक्ष जिंकेल. पंतप्रधानपदासाठी कोणाला पसंती आहे. याचा डेटा तयार करुन मतदानाच्या शेवटच्या दिवशी एक्झिट पोलचा अंदाज वर्तवला जातो.


एक्झिट पोल लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 126A अंतर्गत नियंत्रित आहेत. याशिवाय निवडणूक आयोगाकडून एक्झिट पोलबाबत योग्य मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली जातात. ज्यामध्ये एक्झिट पोलची पद्धत काय असावी हे सांगितलं जातं.


एक्झीट पोलला कधी सुरुवात झाली?
भारतातप्रमाणेच जगभरातील अनेक देशात निकालाआधी एक्झिट पोल जाहीर केले जातात. पण सर्वात पहिला एक्झिट पोल 1936 साली अमेरिकेत घेण्यात आला. त्यावेळी जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिनसन यांनी न्यूयॉर्केमध्ये सर्वे केला होता. यासाठी त्यांनी काही प्रश्नावली तयार केली होती. मतदान केंद्रा बाहेर उभं राहुन त्यांनी मतदारांना हे प्रश्न विचारून डेटा तयार केला.


त्याकेळी या डेटाच्या आधारे फ्रँकलिन डी रुजवेल्ट यांच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. विशेष म्हणजे एक्झिट पोलचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. त्यानंतर जगभरात एक्झिट पोलचं लोण वेगाने पसरलं. 1937 मध्ये ब्रिटन आणि 1938 मध्ये फ्रान्समध्ये एक्झिट पोल घेण्यात आले. 


भारतात पहिला एक्झिट पोल कधी झाला?
भारतात 1957 साली लोकसभा निवडणुकीत पहिला एक्झिट पोल करण्यात आला. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने हा एक्झिट पोल केला होता. 1996 ला दुरदर्शनवर Exit Poll दाखवण्यात आला. यासाठी सर्व्हे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीने केला होता