नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चव्या टप्प्यासाठीच्या मतदानाला सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सात राज्यांमध्ये ५१ मतदार संघांतील जागांसाठी मतदान होत आहे. ज्यामध्ये बिहार, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या टप्प्यात मतदान होत आहे. एकूण ८. ७५ कोटी मतदार निवणुकीसाठी उभ्या असणाऱ्या मतदारांचं भविष्य ठरवत आहेत. मतदानाच्या दिवशी जम्मू काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. लडाख मतदार संघाततही मतदान होणार असून, येथील परिस्थितीकडेही साऱ्यांचच लक्ष आहे. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाचव्या टप्प्यातील मतदानामध्ये महिला मतदारांचा आकडा हा सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वच पक्षांनी सर्वस्व पणाला लावून केलेल्या प्रचारांचे परिणामच या टप्प्यात मतदार मतपेटीत बंद करणार आहे. ज्यामध्ये  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विरुद्ध भाजपच्या स्मृती इराणी (अमेठी), भाजपचे राजनाथ सिंह विरुद्ध समाजवादी पक्षाच्या पूनम सिन्हा (लखनऊ) आणि भाजपचे राज्यवर्धन सिंह राठोड आणि काँग्रेसच्या कृष्णा पुनिया (जयपूर ग्रामीण) अशा लढती आहेत. त्यामुळे या टप्प्यातील मतदानाकडे साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्याशिवाय साध्वी निरंजन ज्योती, जयंत सिन्हा आदींच्या भवितव्यही आज मतपेटीत बंद होणार आहे. 


सत्ताधारी भाजपच्या सर्व जागांकडे राजकीय पटलावर चर्चा सुरू असून पाचव्या टप्प्यातील याच जागांकडे साऱ्यांच्या नजरा आहेत. २०१४ च्या निवडणुकांमध्ये भाजपला ४० जागांवर विजय मिळवता आला होता. तर काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा गेल्या होत्या. तर, उर्वरित जागांवर विरोधी पक्षांना विजय मिळाला होता. त्यामुळे सत्तेची ही गणितं यंदा कितपत बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.