नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चरणातील मतदानाला काही दिवस राहीले आहेत. या पार्श्वभुमीवर फेसबुकने काही कडक पाऊले उचलत काँग्रेस पक्षाची  687 पेज काढून टाकली आहेत. ज्या फेसबुक पेज वरून जनतेच्या विचारांवर प्रभाव पडण्याची शक्यता होती असे पेज फेसबुकने काढून टाकली आहेत. 'रॉयटर'ने या संदर्भातील वृत्त दिले आहे. भारतात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. फेसबुक वरुन हटवण्यात आलेले अधिकतर पेज हे काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत. ऑटोमॅटीक सिस्टिमने हे पेज शोधून काढले.  'को-ऑर्डिनेटिड इनऑथेंटीक बिहेवियर' अंतर्गत हे काम झाले असून काँग्रेस आयटी सेलशी संबंधित हे पेज होते हे समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील सर्वात जास्त फेसबुक युजर्स हे भारतात आहेत. भारतीय फेसबुक युजर्सची संख्या 30 कोटींच्या घरात आहे. पहिल्यांदा लोक फेक अकाऊंट बनवून वेगवेगळ्या ग्रुपमध्ये सहभागी होतात. त्यानंतर आपले म्हणणे पसरवणे तसेच लोकांमधील संपर्क वाढवण्याचे काम करतात. या पेजवर स्थानिक बातम्यांसह पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यही केली जातात असेही समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. 


लोकांनी आपली ओळख लपवून खोटी फेसबुक पेज बनवण्याचे काम केले. असे पेज हे काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित लोकांशी जोडलेले होते हे शोधात समोर आले. या अकाऊंट्स वरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या कंटेटवरून नव्हे तर त्यावरुन सुरू असलेल्या एकंदरीत व्यवहारावरून ही पेज हटवण्यात आल्याचे फेसबुक सायबर सिक्योरीटी पॉलिसीचे प्रमुख नथानिएल ग्लीइकर यांनी सांगितले.


पाकिस्तानची 103 अकाऊंट्स हटवली 


पाकिस्तान सेनेच्या जनसंपर्क विभागाशी संबंधित 103 फेसबुक पेज, ग्रुप आणि अकाऊंट्स देखील हटवण्यात आली आहेत. हे पेज पाकिस्तानमधून चालवण्यात येत होती असे फेसबुकने म्हटले आहे. हे फेसबुक पेज पाकिस्तानातून चालवली जात होती आणि पाकिस्तानी जनसंपर्क विभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे ही पेज चालवली जात असे फेसबुकने म्हटले आहे. फेसबुक प्लॅटफॉर्मचा उपयोग खोट्या बातम्या पसरवण्यासाठी करत असल्याचा आरोप असल्याने भारत सरकारने हे पाऊल उचलले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये अशा प्रकारचे पाऊल उचलण्यात आले आहे.