नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षात पदार्पण केले आहे. नेते, अभिनेते, स्टार्स यांचा राजकीय प्रवेश जोरात सुरू आहे. या सर्वांची डॉ. कुमार विश्वास यांनी खिल्ली उडवली आहे. राजकीय पक्षांमध्ये सहभागी होणाऱ्या बॉलीवुड आणि भोजपुरी स्टार्सवर त्यांनी निशाणा साधला आहे. कुमार विश्वास यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडल वरून एक ट्विट केले. यामध्ये धर्मेंद्रजी, गोविंदाजी, हेमा मालिनीजी, जयाप्रदाजी यांच्यातर्फे दशकभर केलेल्या लोकशाहीच्या सेवेनंतर प्रत्येक पक्षात आलेले नवे सेवक निरहुआजी, रविकिशनजी, उर्मिला मातोंडकरजी यांचेही स्वागत आहे. लवकरच काही महान सेवक-सेविका देशाला बनवण्यासाठी पुढे आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उर्मिला मातोंडकर मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढू शकते. राजकीय वर्तुळात तिच्या निवडणुक लढवण्याची चर्चा जोरात सुरू आहे. पण उर्मिलाकडून अद्याप अधिकृतरित्या याबद्दल घोषणा करण्यात आली नाही. काँग्रेस प्रदेश कमिटी आणि उर्मिला मातोंकर यांच्या जवळच्यांकडूनही याबद्दल कोणते भाष्य करण्यात आले नाही. त्यांच्या नावावर पार्टीच्या नेतृत्वाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. लवकरच याबद्दलची घोषणा केली जाईल असेही सांगण्यात येत आहे.  




निवडणुकीच्या वातावरणाचा परिणाम भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. भोजपुरी सिनेमांचे स्टार आणि बिग बॉस कंटेस्टंट राहिलेला दिनेश लाल यादव निरहुआ देखील भाजपात सहभागी झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत त्याने हा प्रवेश केला. निरहुआ याच्याआधी स्टार रवी किशन आणि मनोज तिवारी यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मनोज तिवारी हे दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आणि खासदार आहेत. निरहुआ निवडणूक लढणार की नाही ? हे आता येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल.