बिहारमध्ये काँग्रेस आणि राजदचे जागा वाटप
बिहारमध्ये राजद आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीचे जागा वाटप करण्यात आले आहे.
पाटणा : उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीने आघाडी करण्यास नकार दिला. त्यामुळे येथे काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत आहे. त्याचवेळी बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलसोबत आघाडी होणार की नाही याची उत्सुकता होती. अखेर घाडी झाली. आज बिहारमधील जागा वाटप आघाडीतर्फे करण्यात आले आहे. राजद 20 तर काँग्रेस 9 जागा लढविणार आहे. काही जागा या मित्र पक्षांना सोडण्यात आल्या आहेत. हिंदुस्थानी आवाम मोर्चा 3, राष्ट्रीय लोक समता पार्टी 5, व्हीआईपी 3, सीपीआय एका जागेवर निवडणूक लढवणार आहे.
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांच्या महायुतीने जागावाटप जाहीर केले. राजदचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पुर्वे यांनी पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप व उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी काही उमेदवारांची यादी देखील जाहीर केली. जदयूचे माजी अध्यक्ष शरद यादव हे राजदच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जितनराम मांझी हे गयामधून निवडणूक लढवणार आहेत. तर जदयूचे माजी अध्यक्ष शरद यादव हे राजदच्या तिकीटावर संभल येथूल निवडणूक लढवणार असल्याचे समजते. राजदच्या विभा देवी यांना नवादातून तिकीट देण्यात आले आहे.