Ambulance Service Contract: राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते,आमदार रोहित पवार हे पत्रकार परिषदेत खेकडा घेऊन आले होते. यावेळी त्यांनी साडेसहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आज आपल्या सर्वांना मी एका खेकड्याची स्टोरी सांगणार आहे, असे म्हणत यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. एका खेकड्याची स्टोरी सांगणार आहे.खेकडा वळवळ करतो. धरण पोखरतो. बिळात जावून बसतो.. लोकांचं लक्ष कमी झालं की पुन्हा बाहेर येतो. असे म्हणत रुग्णवाहिकेबद्दलच्या घोटाळ्याबद्दल आज बोलणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. 


6500 कोटींचा गैरव्यवहार



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात साडे सहा हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर केला. रुग्णवाहिका सेवेमध्ये 6500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी जिवंत खेकडा दाखवत त्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. 


मिळालेल्या पैशाचा वापर निवडणुकीसाठी?


हा दलालीचा प्रकार आहे. त्यातून मिळालेला पैसा निवडणुकीसाठी वापरला जाण्याची शक्यता रोहित पवार यांनी वर्तवली आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. तसेच याप्रश्नी समोरासमोर चर्चा करण्याचेही आव्हानही त्यांनी दिले. 


चौकशीची मागणी


पिंपरी चिंचवड येथील सुमित फॅसिलिटी आणि बिव्हिजी ग्रुपचा गौरव्यवहारात सहभाग असल्याचा दावा यावेळी रोहित पवार यांनी केला. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासह, अर्थमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ही हाताखालून फाईल गेली आहे. आपण चौकशीची मागणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.