Loksabha 2024 : तामिळनाडुच्या निलगिरीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हॅलिकॉप्टरची झडती घेतली. या हॅलिकॉप्टरने राहुल गांधी तामिळनाडूमधून केरळमध्ये वायनाड (Waynad) लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात होते. सोमवारी सकाळी राहुल गांधी आपल्या हॅलिकॉप्टरने (Helicopter) निलगिरीत उतरले. यावेळी अचानक निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी हॅलिकॉप्टपची तपासणी सुरु केली. राहुल गांधी प्रचारासाठी आपल्या वायनाड मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी जात होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वायनाडमध्ये तिरंगी लढत
2019 लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून विजय मिळवला होता. आता 2024 मध्ये राहुल गांधी यांचा सामना भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (CPI) उमेदवार के एनी राजा यांच्याशी होणार आहे. विशेष म्हणजे के एनी राजा हे INDIA आघाडीतील मित्र पक्षातले आहेत. याशिवाय वायनाड मतदारसंघात भाजपचे के सुरेंद्रन यांचंही राहुल गांधी यांना आव्हान आहे. 20 लोकसभा जागा असलेल्या केरळात एकाच टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. तर तामिळनाडुतल्या 39 जागांसठी 19 एप्रिलला मतदान होईल.


वायनाड काँग्रेसचा बालेकिल्ला
केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला. तेव्हापासून या जागेवर काँग्रेसचा कब्जा आहे. या मतदारसंघात 7 विधानसभा जागा येतात. यात मनंथावाडी, सुल्तानबथेरी, कल्पेट्टा आणि कोझीकोड जिल्हे येतात. 2009 या जागेवर काँग्रेसचे एमआय शानसाव खासदार निवडून आले होते. 



वायनाड मतदारसंघाचं राजकीय गणित
वायनाड जिल्ह्याची लोकसंख्या 8.18 लाख आहे, त्यापैकी 4.01 लाख पुरुष आणि 4.15 लाख महिला आहेत. या जिल्ह्याचा साक्षरता दर 89.03 टक्के आहे. वायनाडमध्ये 49.48% हिंदू, 28.65% मुस्लिम आणि 21.34% ख्रिश्चन समुदाय आहे.


वायनाडमध्ये काँग्रेसचा मोठा विजय
वायनाड मतदारसंघात 2009 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक घेण्यात आली. यात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. काँग्रेसच्या एमआय शानवास यांनी सीपीआयचे के एम रहमतुल्लाह यांचा  1,53,439 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. शानवास यांना 4,10,703 आणि रहमतुल्लाह यांना 2,57,264 मत मिळालं.


वायनाडमधून राहुल गांधीच का?
वायनाड आणि मलप्पुरम भागात काँग्रेस आणि ऑल इंडिया मुस्लिम लीगची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. त्यामुळेच गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने सातत्याने विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत राहुलच्या वायनाड जिंकण्याच्या मार्गात फारशा अडचणी येणार नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी हा मतदार संघ निवडला आहे.