दोनदा खासदार असूनही भाजपने तिकीट कापलं! नाराज वरुण गांधी कॉंग्रेसच्या वाटेवर?
Loksabha Election: पीलीभीत लोकसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने वरुण गांधी यांचे पुढचे पाऊल काय असेल? याची सर्वजण वाट पाहत आहेत.
Loksabha Election: देशभरात 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. सध्या राजकीय पक्ष लोकसभा क्षेत्रातील उमेदवारी जाहीर करत आहेत. यामुळे नाराजी नाट्यही मोठ्या प्रमाणात घडतंय. याचाच परिणाम म्हणून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची संख्यादेखील वाढतेय. उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये तिकीट न मिळाल्याने भाजप खासदार वरुण गांधी नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वरुण गांधी कॉंग्रेसचा हात हातात घेणार का? असा प्रश्न पडलाय. का सुरु झाल्यायत या चर्चा? सविस्तर जाणून घेऊया.
भाजप खासदार वरुण गांधी सध्या चर्चेत आहेत. पीलीभीत लोकसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने वरुण गांधी यांचे पुढचे पाऊल काय असेल? याची सर्वजण वाट पाहत आहेत. पीलीभीत मतदारसंघातून वरुण गांधी निवडून आले होते. त्यामुळे ही जागा पुन्हा त्यांना मिळेल, असा विश्वास त्यांना होता. पण भाजपने त्यांचे तिकीट कापून जितीन प्रसाद यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय.
भाजपने वरुण गांधी यांचे तिकीट कापल्यानंतर कॉंग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अधीर रंजन चौधरी यांनी वरुण गांधी यांना कॉंग्रेसमध्ये सहभागी होण्याची ऑफरदेखील केली आहे.
'...म्हणून दिले नाही तिकीट'
वरुण गांधी हे गांधी परिवाराशी संबंधित असल्याने भारतीय जनता पार्टीने त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले नाही. वरुण गांधी हे एक दबंग नेते आहेत. ते स्वच्छ प्रतिमेचे सुशिक्षित नेता आहेत. निवर्तमान लोकसभेमध्ये बोलताना कॉंग्रेस नेते चौधरी म्हणाले, वरुण गांधी दबंग नेता असून त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांचा गांधी परिवाराशी संबंध असल्याने भाजपने लोकसभेचे तिकीट नाकारले आहे. वरुण गांधी हे कॉंग्रेसमध्ये आले तर आम्हाला खूप आनंद होईल', असे चौधरी यावेळी म्हणाले. वरुण आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी काकांची मुलं आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर, महाराष्ट्रात धनंजय मुंडेंना सर्वात मोठी जबाबदारी
पीलीभीतमधून दोनवेळा खासदार
पीलीभीतमधून दोनवेळा लोकसभा सदस्य असलेले वरुण गांधी हे केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश भाजपला वारंवार घरचा आहेर देत असतात. न पटलेल्या धोरणांवर टीका करत असतात. असे असले तरी भाजपने वरुण गांधी यांची आई मेनका गांधी यांना सुल्तानपूर् येथून दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे.