Gold Rate Today 4th June:  4 जून रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. मतमोजणी सुरू असून काहीच वेळात निकाल स्पष्ट होणार आहे. आज मतमोजणीच्या दिवशीत शेअर बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळाली. शेअर मार्केट कोसळल्यानंतर त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवरही पाहायला मिळाला. सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. शेअर बाजार कोसळल्यानंतर गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणुक म्हणून सोन्याचा  पर्याय निवडत आहेत. त्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर होत असल्याचे पाहायला मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी 4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जारी होत आहे. सोन्या-चांदीच्या दरानेदेखील उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. वायदे बाजारात आज सोन्याची किंमत जवळपास 760 रुपयांची वाढ झाली आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 72,870 रुपये इतके आहेत. तर, एमसीएक्सवर चांदीच्या दरातही 100 रुपयांची वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 92,000 रुपये इतके आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात थोडा दबाव असल्याचे पाहायला मिळतेय. या आठवड्याच्या अखेर गुंतवणुकदार थोडे सावध झाले होते. त्यामुळं सोन्याच्या दरात किंची घट झाली होती. स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी घट होऊन2,345 डॉलर वर पोहोचले होते. गोल्ड फ्युचरदेखील .01 टक्क्यांनी घटून 2,366 डॉलरवर पोहोचले होते. 


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट   66, 800 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   72, 870  रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   54, 650 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,680 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,287 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 465 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   53,440 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   58,296 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    43,720  रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट-  66,800 रुपये
24 कॅरेट-  72, 870 रुपये
18 कॅरेट- 54, 650 रुपये