नवी दिल्ली :  लोकसभा निकालाच्या दिवशीच २३ मे रोजी सोनिया गांधी यांनी यूपीए घटक पक्षांची बैठक बोलावली आहे. बिजू जनता दल, टीआरएस, वायएसआरलाही आमंत्रण देण्यात आले आहे. सत्तेसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला पर्यायाने एनडीएला बहुमत मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त करत युपीएच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसने पुढील घडामोडींची आणखी आणि मोर्चेबांधणी करण्यासाठी ही युपीएची बैठक बोलावली असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या बैठकीला सध्या एनडीएसोबत नसलेल्या बिजू जनता दल, टीआरएस आणि वायएसआर यांनाही निमंत्रण पाठवले गेले आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी चर्चा करून त्यांना आमंत्रण दिले आहे. राष्ट्रवादी आणि तेलगू देसम यांनाही बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे.