Loksabha Election 2024:  लोकसभा निवडणुकांचे कल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. राज्यात 400 पारचा दावा करणाऱ्या भाजपला 300 जागांदेखील मिळालेल्या नाहीयेत. जनतेने पुन्हा एकदा एनडीएला बहुमत जरी दिले असले तरी विरोधी पक्षानेही चांगलीच आघाडी घेतली आहे. एनडीएला 294 जागा मिळाल्या आहेत. तर, इंडिया आघाडीने 231 जागांवर मुसंडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकांचे कौल स्पष्ट होऊ लागल्यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली आहे. इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा दावा करणार की विरोधी पक्षात बसणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली आहे. तसंच, राहुल गांधी दोन मतदारसंघातून विजयी झाले आहेत. या दोन मतदारसंघांबाबतही राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वायनाड आणि रायबरेली दोन्ही मतदारसंघातून राहुल गांधी विजयी


राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या रायबरेली आणि केरळच्या वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. गांधींनी दोन्हीही मतदारसंघातून विजय मिळवला आहे. रायबरेलीमध्ये राहुल गांधींनी चार लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे. तर, वायनाडमध्येही गांधींनी मोठा विजय मिळवला आहे. राहुल गांधींनी दोन जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळं त्यांना एक जागा सोडावी लागणार आहे. एकतर राहुल गांधी रायबरेली किंवा वायनाड या दोघांपैकी एकाच जागा निवडावी लागणार आहे. 


पत्रकार परिषेदेत जेव्हा राहुल गांधी यांना रायबरेली की वायनाड या दोघांपैकी कोणता मतदारसंघ निवडणार? असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं आहे की, रायबरेली आणि वायनाडच्या मतदारांचे मनापासून धन्यवाद करतो. आता निर्णय घ्यायचा आहे की मी कोणती जागा निवडेन. त्याआधी यावर थोडी चर्चा करेन मगच यावर निर्णय घेईन. दोन्ही जागांवर तर राहू शकत नाही. मात्र आता अद्याप निर्णय घेतला नाहीये. 


पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष एका पक्षाच्या विरोधात लढले नाही तर आम्ही अनेक संस्थांच्या विरोधातही लढलो. सर्व संस्था आमच्या विरोधात होत्या. ही लढाई सविधान वाचवण्यासाठी होती. लोकसभा निवडणुका निकाल तुम्ही पाहिले तर इंडिया आघाडीला 231 आणि एनडीएला 294 जागांवर विजय मिळाला आहे. इंडिया आघाडीत काँग्रेसने 91 जागांवर आघाडी घेतली आहे. 


राहुल गांधी 2014 ते 2019 पर्यंत अमेठीत खासदार होते. मात्र मागील लोकसभा निवडणुकीत त्यांना अमेठीतून स्मृती इराणी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर, एकीकडे वायनाड मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. अमेठीतून पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींना वायनाडच्या जनतेने निवडून दिलं होतं. त्यामुळं वायनाडकडे राहुल गांधी यांचा भावनिक ओढा जास्त आहे. तर, रायबरेली हा गांधी घराण्याचा पारंपारिक मतदारसंघ आहे. 


देशात पहिली लोकसभा निवडणूकांवेळी फिरोज गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवली होती. इतकंच नव्हे तर इंदिरा गांधी व सोनिया गांधी यांनीही रायबरेलीतून खासदारकी लढवली होती. फिरोज गांधी, इंदिरा गांधी, अरुण नेहरू आणि सोनिया गांधीपर्यंत संसदेत पोहोचवले आहे. सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्यासाठी रायबरेलीची जागा सोडली आहे. तसंच, एका सभेच्या दरम्यान मी तुम्हाला माझा मुलगा सोपवतेय. जसं मला तुम्ही प्रेम दिलं तसं राहुलला देखील द्याल, तो तुम्हाला कधीच निराश नाही करणार, असं भावनिक अवाहन सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या जनतेला केलं होतं.