लोकसभेसाठी गोंदियातून प्रफुल्ल पटेल की नाना पटोले?
भाजपाचे बंडखोर आमदार नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे.
मुंबई : भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रस-राष्ट्रवादीनं एकत्र येऊन लढवावी, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मांडली आहे. भाजपाचे बंडखोर आमदार नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे नजिकच्या काळात इथं पोटनिवडणूक होणार आहे.
राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू
या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आता काँग्रेसमध्ये गेलेले पटोले ही निवडणूक लढण्यास इच्छुक असणार, हे उघड आहे. मात्र त्याच वेळी ही जागा राष्ट्रवादीची असून प्रफुल्ल पटेल इथून निवडणूक लढले होते, याची आठवण तटकरेंनी करून दिली आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन लढावं, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.