Narendra Modi on EVM : एनडीएच्या बैठकीत एकमताने नेतेपदी निवड झाल्यानंतर येत्या 9 जून रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारेत. या शपथविधी सोहळ्यासाठी (Swearing in Ceremony) भाजपच्या (BJP) सर्व आमदारांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळतेय. याआधी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.  ईव्हीएम मशीन (EVM) जिवंत आहे की मेलं? असा खोचक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावलाय. सतत EVM विरोधात टीका करणाऱ्या विरोधकांच्या तोंडाला निकालानंतर टाळं लागलं, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावलाय. भारताच्या लोकशाही आणि निवडणूक आयोगाची हीच ताकद आहे. आता पुढच्या पाच वर्षात ईव्हीएमविरोधात काहीही ऐकू येणार नाही, पण जेव्हा 2029 मध्ये निवडणुका होतील तेव्हा पुन्हा विरोधकांकडून पुन्हा हा प्रश्न उपस्थित केला जाईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय लोकशाहीची ही ताकद असून यावेळच्या निकालांनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना गप्प केलं आहे. इंडि आघाडीतील लोकं ईव्हीएम, आधारसारख्या तांत्रिक प्रगतीवर प्रश्न उपस्थित करतात तेव्हा असं वाटतं की ते गेल्या शतकातील आहेत, असा टोलाही पीएम मोदी यांनी लगावला आहे. 


देशाात 22 राज्यातील लोकांना एनडीएला त्यांची सेवा करण्याची संधी दिली आहे. आमची ही युती भारताचा आत्मा आहे आणि खऱ्या अर्थाने ते भारताचं प्रतिबिंब आहे. एनडीएतील घटक पक्षांमधील विश्वासाचं नातं मजबूत आहे आणि अतुट आहे असंही पीएम मोदी यांनी म्हटलं आहे. 


पंतप्रधान म्हणाले की, देशात 10 राज्ये अशी आहेत जिथे आदिवासी समुदयाची संख्या प्रभावी आणि निर्णायक आहे. यापैकी सात राज्यांमध्ये एनडीएचं सरकार आहे. आम्ही सर्व धर्म आणि संविधानाच्या समानतेसाठी समर्पित आहोत. गोवा असो वा ईशान्य भारत, जिथे मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव राहतात. आज एनडीएला या राज्यांमध्येही सेवा करण्याची संधी मिळाली आहे. देशाच्या इतिहासात इतर कोणत्याही आघाडीला  इतकं यश मिळालेले नाही असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.


भाजपची महत्त्वपूर्ण बैठक


लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपची महत्त्वूपूर्ण बैठक होतेय.  यात विधानसभा मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घेतला जाण्याची शक्यताय. दरम्यान, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या NDAच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानाचं पान मिळालं. या बैठकीत अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट मंचावर स्थान मिळालं. अजित पवार अमित शाह यांच्या उजव्या हाताला बसले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नितीश कुमारांच्या शेजारी बसले होते. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तर एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळे या दोघांना  मंचावर बसण्याचा मान मिळाला.