डिजिटल जगामध्ये हल्ली लग्न देखील मोबाइलवर ठरवलं जातं. मुला-मुलीची पसंती याच ऑनलाईन पद्धतीने केली जाते. पण अनेकदा या सगळ्या प्रक्रियेत फसवली जाण्याची शक्यता जास्त असते. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामध्ये एका दरोडेखोर वधुचा खरा चेहरा समाजासमोर आला आहे. जयपुर पोलिसांनी उत्तराखंडमध्ये एका लोकप्रिय ज्वेलर्सला लुटण्याचा विचार करण्याला वधुला अटक केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयपूरच्या एका प्रसिद्ध ज्वेलर्सला लग्नाच्या ॲपद्वारे जाळ्यात ओडून या महिलेने अडकवलं. कुटुंबीयांचा विश्वास जिंकल्यानंतर तिने 36 लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरून नेली. मात्र त्यानंतरही तिचा ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरूच होता. तिने डेहराडूनमध्ये पती आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्यांना धमकावणे सुरूच ठेवले.


जोतवाडा येथील रहिवासी असलेल्या एका ज्वेलर्सने 29 जुलै 2023 रोजी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर मुलांची काळजी घेण्यासाठी आणि जीवनसाथी शोधण्यासाठी पालकांनी विवाह ॲपवर मुलाच्या नावाची नोंदणी केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या ॲपवर त्यांना एक महिला सापडली, जिला भेटण्यासाठी तो डेहराडूनला गेला आणि तिच्या संमतीनंतर दोघांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न केले.


ज्वेलर्स मालकाने आपल्या दरोडेखोर पत्नीबद्दल सांगितलं की,तिने प्रथम कुटुंबाचा विश्वास जिंकला आणि नंतर अचानक एके दिवशी घराच्या तिजोरीतून 36.50 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम काढून पळ काढल्याचा आरोप ज्वेलरने केला. पत्नीवर एवढा विश्वास ठेवणाऱ्या ज्वेलर्ससाठी ही घटना मोठा धक्का होती.


डेहराडूनमधून अटक करण्यात आलेल्या या महिलेबाबत डीसीपी अमित कुमार यांनी सांगितले की, ती डेहराडून, उत्तराखंडची रहिवासी आहे. याआधीही तिनेने अनेक व्यावसायिक आणि इंजिनिअर्सना लग्नाच्या जाळ्यात अडकवून तुरुंगात पाठवले आहे.


या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी दरोडेखोर वधूची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. यावेळी टीमला काही सुगावा लागला, त्यानंतर मुरलीपुरा पोलिस स्टेशनच्या विशेष पथकाने उत्तराखंडमधील दरोडेखोर वधूच्या घरावर छापा टाकला. येथून पोलिसांनी  या महिलेला अटक केली, तर दरोडेखोर नवरीची कडक चौकशी केली तर आणखी अनेक मोठे गुन्हे उघडकीस येऊ शकतात.


पोलिस तपासात असे समोर आले आहे की, लुटारू नवरी लग्न ॲपवर श्रीमंत आणि घटस्फोटित पुरुषांना टार्गेट करत असे. ती त्याच्याशी बोलून त्याच्या व्यवसायाची माहिती मिळवायची आणि नंतर त्याला लग्नाचे आमिष दाखवायची. लुटारू नवरीची मोडस ऑपरेंडी अशी होती की लग्नानंतर ती तीन-चार महिने पतीच्या कुटुंबात मिसळायची आणि त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करायची. त्यांचा विश्वास जिंकताच तिने संधी साधून घरात ठेवलेले लाखो रुपयांचे दागिने चोरून पळ काढला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोर नववधूंचे लक्ष्य नेहमीच श्रीमंत आणि घटस्फोटित पुरुष होते. त्यांना अडकवण्यासाठी तिने मॅरेज ॲप्सचा वापर केला. त्यानंतर ती त्यांच्याशी लग्न करायची आणि त्यानंतर त्याच्या घरातून लाखो रुपये आणि दागिने चोरून पळून जायची.


दरोडेखोर नवरीचा आणखी एक चेहरा समोर आला आहे, ज्यामध्ये ती पीडित व्यक्तीला ब्लॅकमेल करत असे. पीडित व्यक्ती तिला पकडण्याचा प्रयत्न केला असता, ती महिलांच्या छळाचा गुन्हा पतीसह कुटुंबीयांवर दाखल करून त्यांना ब्लॅकमेल करत असे. दरोडेखोर नववधूची ब्लॅकमेलिंगची पद्धत अशी होती की तिने पीडित मुलांना धमकी दिली की जर त्यांनी तिच्या मागण्यांचे पालन केले नाही तर ती त्यांना तुरुंगात पाठवेल.


ही धमकी इतकी मोठी होती की, पीडितांना तिने पैसे देण्यास भाग पाडले गेले. सध्या दरोडेखोर नवरी पोलिसांच्या ताब्यात असून तिची चौकशी करण्यात येत आहे. यातून अनेक मोठे खुलासे होऊ शकतील आणि दरोडेखोर वधूच्या इतर बळींचाही छडा लावता येईल, अशी आशा पोलिसांना आहे.