नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातली फुलपूर आणि गोरखपूर मतदारसंघासाठी झालेल्या लोकसभेच्या पोठनिवडणूकीत भाजपला सपाटून मार खावा लागणार, असे चिन्ह आहे. या ठिकाणी झालेल्या दोन्ही निवडणूकीत समाजवादी पक्ष आघाडीवर असून, भाजप पिछाडीवर आहे. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागने स्वाभावीक. एनडीएचा घटक पक्ष आणि सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेनेने भाजपच्या जखमेत जोरदार बाण मारला आहे.


संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या पराभवावर टीका करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. भाजपची हवा गेली असून, प्रभू रामचंद्रांवर वाईट शब्दात टीका करणाऱ्यांना लाल गालीचा अंथरल्यामुळेच भाजपची अशी अवस्था झाल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या वेळी राऊत यांच्या टीकेचा रोख नरेश अगरवाल यांच्या भजप पक्षप्रवेशाकडे होता. समाजवादी पक्षाचे नेते आणि खासदार असलेल्या नरेश अगरवाल यांना भाजपने नुकताच पक्षप्रवेश दिला.


समाजवादी-बसपा फॅक्टर मानत नाही - राऊत


भाजपच्या पराभवाला समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाची झालेली अघाडी कारणीभूत ठरली. मात्र, संजय राऊत यांनी समाजवादी-बसपा हा फॅक्टर आपण मानत नाही. मला वाटते की, ज्यांनी रामावर टीका केली त्यांनाच पक्षाने प्रवेश दिला. त्यामुळेच भाजपचा पराभव झाल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.