Love Story : या सोशल मीडियाच्या जगात कधी काय होईल याचा काही नेम नाही. ना कोणी कसली कल्पना करु शकतो. आज फेसबुक, इन्स्टाग्रामवर जगाच्या पाठीवर कोणी कोणाशीही संपर्कात येतो. न पाहता न भेटता त्यांचं ऋणानुबंध जुळतात. ती नाती इतकी मजबूत होतात की कसलाही विचार न करता, कुठलीही मर्यादा न पाळता, हे एकमेकांच्या प्रेमात पडतात. ऑनलाइन प्रेम प्रकरण हल्ली मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा नात्यामध्ये अनेक वेळा मोठा धोका मिळतो. पण फारच कमी नाती ही खरं असतात. अशीच एक विचित्र प्रेम कहाणी समोर आली आहे. ज्यामध्ये इन्स्टाग्रामव त्या दोघी भेटल्या आणि त्यांच्यामध्ये मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर कधी प्रेमात झालं हे त्यांनाही कळलं नाही. मग कोसो दूर असलेल्या या दोघी एकमेकींना भेटण्यासाठी आतूर झाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मग त्यातील एका मुलीने घरच्यांना न कळवता घरातून पळ काढला आणि मैत्रिणीच्या घरी मुझफ्फरपूरला पोहोचली. दोन दिवस ती मैत्रिणीच्या घरी राहिली आणि एक दिवस त्या दोघींनी धक्कादायक पाऊल उचललं. पुढे झालं असं की, एकेदिवशी दोघींनी कपडे आणि काही वस्तू घेतल्या आणि बॅग भरली. ती बॅग घेऊन त्यांनी घरातून पळ काढला. त्यांना पळ काढताना शेजाऱ्यांनी पाहिलं आणि त्यांना संशय आला. त्या लोकांनी दोघांनाही थांबवून चौकशी केली असता त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. 


मैत्रिणीच्या घरी आलेली मुलगी ही आसाममधून 600 किलोमीटरचा प्रवास करून मुझफ्फरपूरला त्या मुलीच्या घरी आली होती. या दोघींना लोकांनी पोलिसांसमोर उभं केल असता त्या दोघींनी आपण लग्नासाठी पळून जात असल्याचा सांगितलं. आम्ही संज्ञान आहोत आणि आम्हाला लग्न करायच आहे. 


दोघे आसामला जाऊन लग्न करणार...


दोन्ही मुलींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी मुजफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या मुलीच्या कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती दिली. कुटुंबीयांनी सांगितले की, मुलगी फक्त 17 वर्षांची असून आसाममधील मुलीला मैत्रिणी म्हणून बोलावलं आणि तिला दोन दिवस घरात डांबून ठेवलं. त्याचवेळी पोलिसांचे म्हणं आहे की, दोन्ही मुली स्वत:ला प्रौढ म्हणवत आहेत आणि आसाममध्ये लग्न करण्यासाठी घरातून पळून जात होत्या. आसाममधील मुलीच्या कुटुंबियांना या प्रकरणाची माहिती दिल्याच पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्यावर निर्णय घेणार आहे. प्रेमासाठी या दोन अल्पवयीन मुलींनी धक्कादायक पाऊल उचलं.