घटस्फोटानंतर 5 वर्षांनी पुन्हा तिच्यासोबतच थाटला संसार, `त्या` एका घटनेने बदललं जोडप्याचे आयुष्य
Trending News In Marathi: नातं तुटायला एक क्षण पुरेसा असतो. पण सगळे गैरसमज विसरून पुन्हा एकत्र येणे खूप कठिण असते. पण एका जोडप्याने हे शक्य करुन दाखवले आहे.
Trending News In Marathi: नात्यात गैरसमज निर्माण झाले की ते तुटायला वेळ लागत नाही. पण गैरसमज दूर झाले की ते नातं आणखी घट्ट होतं. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ही गोष्ट उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे राहणाऱ्या विनय जयस्वाल आणि त्याची पत्नीची. विनयने फेसबुकवर त्यांची प्रेमाची गोष्ट शेअर केली आहे. विनयच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे.
घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र आले
नातं टिकवण्यासाठी एकमेकांप्रती विश्वास आणि आदर असणे खूप गरजेचे असते. जर विश्वास डळमळीत झाला तर नातं तुटायला वेळ लागत नाही. मग अशावेळी गोष्ट घटस्फोटापर्यंत जायला वेळ लागत नाही. विनय जयस्वाल व त्यांच्या पत्नीसोबत असंच काहीच घडलं होतं. दोघांच्याच भांडणं झाली त्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचे ठरवले. दोघांचा घटस्फोटही झाला. मात्र, आता एका घटनेने दोघं पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी लग्नही केले आहेत.
11 वर्षांनंतर पुन्हा एकत्र
पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी पाच वर्षांनंतर पुन्हा लग्न केले. विनय जयस्वाल यांनी फेसबुकवर फोटो पोस्ट केले आहेत. तसंच, एक पोस्टही त्यांनी केली आहे. 11 वर्षांनंतर आम्ही पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबीयांच्या साक्षीने विधिवत लग्न आणि विवाह नोंदणी केली. त्याचबरोबर घटस्फोटाची डिक्रीदेखील रद्द केली. आम्ही दोघं आता एकमेकांच्या सोबत आहेत.
त्या एका घटनेने बदललं मत
विनय यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे की, 2012मध्ये त्यांचे लग्न झाले होते. मात्र, दोघांमध्ये काही कारणास्तव भांडणं झाली होती. त्यानंतर त्यांनी 2018मध्ये घटस्फोट घेतला. दोघांचे मार्ग वेगळे झाले. मात्र, त्याचदरम्यान विनय यांना हृदयविकाराचा झटका आला. हे त्यांच्या पत्नीला कळले. आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीची अवस्था तिला बघवली गेली नाही.
विनय रुग्णालयात असताना ती त्याची काळजी घेण्यासाठी तिथे पोहोचली. याकाळात तिने त्याला पूर्ण साथ दिली. विनयने त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहलं आहे की, ओपन हार्ट सर्जरीनंतर सीसीयू ते घरी जाईपर्यंत मी पूर्ण बरा होईपर्यंत तिने माझी साथ सोडली नाही. हृदयविकाराच्या झटक्यामुळं आमच्या दोघांमधील गैरसमजदेखील दूर झाले. आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि आता आम्ही लग्नदेखील केले आहे.