LPG सिलिंडर महागला, पाहा आपल्या शहरातील नवीन दर
विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या (Non-Subsidised LPG) किंमती वाढल्या आहेत. IOCने डिसेंबरसाठी गॅसचे दर जाहीर केले आहेत.
मुंबई : विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या (Non-Subsidised LPG) किंमती वाढल्या आहेत. IOCने डिसेंबरसाठी गॅसचे दर जाहीर केले आहेत. देशभरात विना अनुदानित LPG सिलिंडरच्या (Cylinder) किंमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अनुदान नसलेल्या एलपीजी सिलिंडरच्या दरात (LPG Cylinder Rates) पाच महिन्यांनंतर प्रथमच वाढ झाली आहे.
हे आहेत आपल्या शहरातील एलपीजी दर
IOC वेबसाइटच्या म्हणण्यानुसार, या वाढीसह दिल्लीत डिसेंबरमध्ये १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरचा दर ६४४ रुपये झाला आहे, जो आधी ५९४ रुपये होता. कोलकातामध्येही हा दर वाढून ६७०.५० पैसे झाला आहे, जो पूर्वी ६२०.५० पैसे होता. मुंबईत विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत ५९४ रुपयांवरून ६४४ रुपयांवर गेली आहे. चेन्नईमध्ये विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत ६१० रुपयांवरून ६६० रुपयांवर गेली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतही ५६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
डिसेंबरमध्ये विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमती
१४.२ किलो सिलिंडर
शहर जुना दर नवीन दर
शहर जने दर नवीन दर
दिल्ली ५९४ ६४४
मुंबई ५९४ ६४४
कोलकाता ६२०.५० ६७०.५०
चेन्नई ६१० ६६०
कमर्शियल सिलिंडरही ५६ रुपयांनी महागला
१९ किलो एलपीजी सिलिंडर
शहर नवीन दर
दिल्ली १२९६
मुंबई १२४४
कोलकाता १३५१
चेन्नई १४१०.५०
तेल कंपन्या दरमहा एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करतात. जुलै महिन्याच्या सुरूवातीला तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमती बदलल्या. यावर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाव्हायरस साथीमुळे सरकारने घरगुती एलपीजी गॅस अनुदानदेखील दिले नाही. ज्याद्वारे सरकारने थेट २० हजार कोटींची बचत केली होती.