नवी दिल्ली : नवी कार्यप्रणाली आणि काम करण्याची पद्धती यांच्या बळावर येत्या दिवसांमध्ये म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. हे असे नियम असतील ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीपासून ते अगदी बँक व्यवहारापर्यंतचे हे नियम नेमके आहेत तरी कोणते, चला जाणून घेऊया.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गॅस डिलिव्हरीच्या प्रक्रियेत बदल... 
घरगुती गॅसची बुकींग करण्यावरच आता ही प्रक्रिया थांबणार नाही. बुकींगनंतर ग्राहकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवण्यात येईल. ज्यावेळी सिलेंडर डिलिव्हरी बॉय घरी येईल, तेव्हा त्या व्यक्तीसोबत ग्राहकांनी हा ओटीपी शेअर करणं अपेक्षित असेल. प्रथम DAC चा वापर हा १०० स्मार्ट शहरांमध्ये केला जाणार आहे. ज्यासाठी दोन शहरांमध्ये पायलट प्रोजेक्टही सुरु आहे. त्याशिवाय केंद्राच्या धोरणांनुसार पेट्रोलियम कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅसच्या दरांचा आढावा घेतला जातो. परिणामी हे दर बदलण्याची शक्यता आहे. 


SBI व्याजदरात होणार कपात... 
भारतीय स्टेट बँकमधील बचत खातेधारकांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण, बँकेकडून १ नोव्हेंबरपासून व्याजदर ०.२५ टक्क्यांनी कपात होऊन हा दर ३.२५ टक्क्यांवर आणला जाणार आहे. 


डिजिटल पेमेंटवर शुल्क आकारणी ऩाही... 
जवळपास ५० कोटी आणि त्याहून अधिक रकमेची उलाढाल करणाऱ्या उद्योजकांना डिजिटल व्यवहार बंधनकारक असतील. यावर कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. 


 


महाराष्ट्रात बँकांच्या वेळेत बदल 
राज्यभरातील बँकांच्या वेळांमध्ये आता सातत्य दिसून येणार आहे. कारण, राज्यातील सर्व बँका यापुढं म्हणजेच १ नोव्हेंबरपासून सकाळी  ९ वाजता सुरु होतील आणि सायंकाळी ४ वाजता बंद होतील. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना हे नियम लागू असतील.