LPG Cylinder Price: नव्या वर्षात अर्था 2024 या वर्षात देशातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह आहेत. राजकीय उलथापालथही होण्याची शक्यता आहे. अनेक मोठी नावं येत्या काळात सत्ताधारी भाजपच्या बाजूनं जाऊ शकतात असं राजकीय विश्लेषकांचं मत, या साऱ्यामध्येच आता आगामी निवडणुकांच्या आधीपासूनच सरकारनं मोर्चेबांधणी सुरु केली असून, प्रत्येक क्षेत्राच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत नागरिकांवर आणि परिणामी मतदारांवर प्रभाव पाडण्याचं काम सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचा एक भाग म्हणजे सरकानं घेतलेला गॅस दरातील कपातीचा निर्णय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या वर्षाआधीच सरकारच्या वतीनं 19 किलोग्राम वजनाच्या व्यावसायिक वापरातील गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहेत. 39 रुपयांनी हे दर कमी करण्यात आले असल्यामुळं आता देशाच्या विविध शहरांमध्ये व्यावसायिक वापरातील एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. असं असलं तरीही घरगुती वापरातील सिलेंडरचे दर मात्र स्थिर असून त्यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी.  


हेसुद्धा वाचा : Jammu and Kashmir Terror Attack: भयंकर! लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 4 जवान शहीद 


 


आता किती रुपयांना विकला जातोय गॅस सिलेंडर? 


एलपीजीच्या दरात कपातीचा निर्णय घेतल्यानंतर आता 39 रुपये कमी होताच व्यावसायित गॅस सिलिंडरचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या एका सिलेंडरसाठी 1710 रुपये, दिल्लीमध्ये 1757.50 रुपये, कोलकातामध्ये 1869 रुपये आणि चेन्नईमध्ये 1929.50 रुपये मोजले जात आहेत. नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागताआधी मिळालेल्या या सवलतीमुळं आता अनेकांनाच याचा फायदा होणार आहे. 


याआधी 1 डिसेंबरलाही इंधन कंपन्यांनी 19 किलोग्राम वजनाच्या सिलेंडरच्या दरात बदल करून 21 रुपयांची वाढ केली होती. त्याआधी म्हणजे 16 नोव्हेंबरला हे दर 57 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतला असता व्यावसायिक वापरातील गॅसचे दर स्थिर नसून त्यामध्ये सातत्यानं बदल होताना दिसत आहेत. 


एकिकडे व्यावसायिक वापरातील सिलेंडरच्या दरात चढ -उतार पाहायला मिळत असतानाच घरगुती वापरातील सिलेंडरच्या किमती मात्र कैक दिवसांपासून स्थिर आहेत. 30 ऑगस्ट 2023 ला घरगुती सिलेंडरचे दर 200 रुपयांनी कमी करम्यात आले होते. ज्यानंतर मुंबईत त्यासाठी 902.50 रुपये, दिल्लीमध्ये 903 रुपये आणि कोलकात्यामध्ये 929 रुपये इतकी किंमत मोजावी लागत आहे.