LPG Cylinder Price Hike: देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर 2024पासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. इंडियन ऑइलने एक नोव्हेंबरपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 62 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता गॅस सिलेंडरची किंमत 1802 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी तेल कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्या तारखेलाच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडू सकते. नवीन महिन्याची आजपासूनच सुरुवात होत आहे. सणासुदीचे दिवस असून दिवाळी साजरी करण्यात येत आहे. तर, याच महिन्यात लग्नसराईचे दिवस सुरु होणार आहेत. तर, याच महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. 10 किलोच्या कमर्शिअल एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 62 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आता या गॅस सिलेंडरची किंमत 1802 रुपये प्रति सिलेंडर आहे. याआधी 1740 रुपये सिलेंडरची किंमत होती. 


तुमच्या शहरांत किती आहे सिलेंडरची किंमत?


दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1740 रुपयांनी वाढून 1802 रुपये इतकी झाली आहे. कोलकातामध्ये 1850 रुपयांनी किंमत वाढून 1911.50 रुपये इतकी झाली आहे. मुंबईत 1692.50 रुपयांनी वाढून व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1754.50 रुपये इतकी झाली आहे. चेन्नईत 1903 रुपयांनी वाढून 1964.50 रुपयावर पोहचली आहे. 


घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती जैसै थे


आजपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणातच बदल झालेला नाहीये. व्यावसायिक एलपीजी गॅसे सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने हॉटेलमधील जेवण महागण्याची शक्यता आहे. रेस्टॉरंट्समधील जेवणाचे दर वाढू शकतात.