LPG Gas Cylinder QR Code: तुम्हीही घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण, नियमांमध्ये झालेला बदल आणि त्यामुळं होणारे परिणाम थेट तुम्ही स्वत: अनुभवू शकणार आहात. महागाईचा आगडोंब माजलेला असताना सिलिंडरची दरवाढ पुरेशी होती, आता नवं काय? असा चिंतेचा सूर तुम्ही आळवत असाल, तर त्याची गरज नाही. कारण, इंड‍ियन ऑयल कॉरपोरेशन लिमिटेड (IOCL) च्या वतीनं आता QR कोड (QR Code) बेस्‍ड सिलिंडर लाँच करण्यात आला आहे. ज्यामुळं आतापर्यंत कधीही न केलेलं काम तुम्ही करु शकणार आहात. (LPG Gas Cylinder Price  QR Code for next three months )


LPG Gas Cylinder ला तुम्ही ट्रॅक करु शकता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंड‍ियन ऑयल (IOCL) चे संचालक श्रीकांत माधव वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या तीन महिन्यांपर्यंत जवळपास सर्वच सिलिंडरवर क्यूआर कोड येणार आहेत.  वर्ल्‍ड एलपीजी वीक 2022 (World LPG Week 2022) च्या निमित्तानं वक्तव्य करत असताना ही एक मोठी क्रांतीच असल्याचं वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केलं. आता ग्राहक एलपीजी सिलिंडर ट्रॅक करु शकतात, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. 


कसा असेल हा नवा क्यूआर कोड 


QR कोडच्या (QR Code) माध्यमातून ग्राहकांना सिलिंडरबाबतची सर्व माहिती मिळणार आहे. सिलिंडर कुठे रिफिल करण्यात आला आहे, इथपासून त्याच्याशी संबंधित सेफ्टी टेस्टपर्यंत बऱ्याच गोष्टींची माहिती यातून मिळणार आहे. सध्याच्या सिलिंडरना हा कोड लेबलच्या माध्यमाकून चिटकवण्यात येईल. तर, नव्या सिलिंडरवर तो वेल्ड केला जाईल. 


Bank News : आजपासून 'ही' बँक पूर्णत: Private; सरकारला कोट्यवधींचा नफा 


 


सध्या सदर प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यात 20 हजार सिलिंडर जारी करण्यात आले आहेत. हा एक प्रकारचा बारकोडच आहे जो एका ड‍िज‍िटल ड‍िवाइसनं माहिती पुरवू शकतो. त्यामुळं तुम्ही सिलिंडरचा प्रवास पाहू शकता आणि त्यासंदर्भातील सर्व माहितीही अगदी सोप्या आणि सहज पद्धतीनं मिळवू शकता.