LPG Gas Price Update: गॅस सिलिंडरबाबत आताची मोठी बातमी. देशभरातील गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींबाबत (Gas Cylinder Price) सरकारी तेल कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला गॅस सिलिंडर घेण्यासाठी आणखी पैसे तुम्हाला खर्च करावे लागणार आहेत. महागाईत आणखी तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.  एलपीजी सिलिंडरवरील सवलत आता रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच, आतापासून तुम्हाला एलपीजी बुकिंगसाठी आणखी रुपये मोजावे लागतील.


मिळणारी सूट रद्द


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी तेल कंपन्यांकडून व्यावसायिक गॅस सिलिंडरवर 200 ते 300 रुपयांची सूट देण्यात येत होती. ही सुट आता रद्द करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलिंडरवर अधिक सवलत देणाऱ्या वितरकांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.


सरकारी तेल कंपन्यांनी दिले आदेश


देशातील तीन सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) आणि HPCL (HPCL) आणि BPCL (BPCL) यांना माहिती देताना त्यांनी वितरकांना सांगितले आहे की, आतापासून कोणत्याही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना सवलतीची सुविधा मिळणार नाही. हा निर्णय 8 नोव्हेंबरपासून लागू झाला आहे. 


कोणत्या सिलिंडरवर सूट रद्द झालेय


इंडियन ऑइलकडून मिळालेल्या माहितीनुसार, 19 किलो आणि 47.5 किलोचे सिलिंडर सवलतीशिवाय विकले जातील. यासोबतच HPCL ने म्हटले आहे की 19 किलो, 35 किलो, 47.5 किलो आणि 425 किलोच्या सिलिंडरवर उपलब्ध असलेल्या सर्व सवलती रद्द केल्या जात आहेत.