नवी दिल्ली : LPG Price : LPG सिलिंडरचे नवीन दर जाहीर झाले आहेत. आज व्यावसायीक वापरावयाचा सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ही कपात केली आहे, तर घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दर कमी झालेत. जवळपास 135 रुपयांनी 19 किलोंचा व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत आत्तापर्यंत 2306 रूपयांना व्यावसायिक वापराचा सिलिंडर मिळत होता. मात्र आता त्याचे नवे दर 2171 रूपये 50 पैसे इतके असतील. 1 मे या दिवशी 100 रूपयांनी व्यावसायिक वापराचा सिलिंडर महागला होता. मात्र एकीकडे व्यावसायिक वापराचा सिलिंडर स्वस्त होतानाच घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर बदलले नाहीत.   


मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना दोनदा धक्का बसला होता. 7 मे रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात (एलपीजी सिलिंडरची किंमत आज) महिन्यात प्रथमच 50 रुपयांनी वाढविण्यात आली होती आणि 19 मे रोजीही घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती.


7 मे रोजी एलपीजीच्या दरात झालेल्या बदलामुळेघरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला तर 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर सुमारे 10 रुपयांनी स्वस्त झाला. 19 मे रोजी त्याचे दर आठ रुपयांनी वाढले होते.


 आजूपासून 19 किलोच्या सिलिंडरवर थेट 135 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. आता 19 किलोचा सिलिंडर दिल्लीत 2354 ऐवजी 2219 रुपये, कोलकात्यात 2454 ऐवजी 2322, मुंबईत 2306 ऐवजी 2171.50 आणि चेन्नईमध्ये 2507 ऐवजी 2373 रुपयांना विकला जाईल.