लखनऊ : विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठं घबाड सापडलं. अधिकाऱ्यांना माहिती मिळताच विमानतळावर कारवाईसाठी निघाले. अधिकाऱ्यांना कचरापेटी पाहिली आणि त्यांना मोठा धक्काच बसला. यामध्ये थोडं नाही तर तब्बल 36 लाख रुपयांचं सोनं होतं. कचारापेटीतून सोन्याची बिस्किटं सापडली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. त्यांना कचरापेटीतून सोनं मिळालं. 36.60 लाख रुपये किंमतीचं सोनं कचरापेटीत सापडलं आहे. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कचऱ्याच्या पेटीमध्ये काळ्या रंगाच्या पिशवीत काळ्या सेलोटेपनं सील केलेली सोन्याची बिस्कीटं सापडली आहेत. सोन्याची तस्करी करणाऱ्याने अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी हा डाव साधला असावा अशी शक्यता आहे. या प्रकरणी कसून चौकशी सुरू आहे. 


काही दिवसांपूर्वी याच विमानतळावर सोन्याच्या तस्करीचं एक प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणात 3149.28 ग्रॅम सोन्याची बिस्कीटं जप्त करण्यात आली होती. या सोन्याची किंमत साधारण 2 कोटी रुपयांच्या जवळपास होती. या सोन्याच्या बिस्कीटांना काळ्या रंगाच्या टेपनं गुंडाळण्यात आलं होतं. असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता कस्टम विभागाकडून चौकशी सुरू आहे.