लखनऊ : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पूर्वोत्तर राज्य, पश्चिम बंगाल, नवी दिल्लीनंतर आता लखनऊमध्येही आंदोलकांकडून निदर्शनं होत असल्याची माहिती समोर आली आहे. लखनऊच्या नदवा कॉलेजमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विद्यार्थ्यांनी सोमवारी हिंसक आंदोलन केलं. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये हिंसक चकमकही झाली. विद्यार्थ्यांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. कॉलेजबाहेर मोठ्या संख्येत  पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कॉलेजच्या आत विद्यार्थ्यांकडून सतत दगडफेक सुरु आहे. नवदा कॉलेजमध्ये सध्या २ हजार विद्यार्थी हजर असल्याची माहिती मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरिकत्व सुधारणा कायदाविरोधात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रदेश सरकाने अलीगढ, सहारनपूर, कासगंज आणि मेरठसह इतरही जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. या जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.



नागरिकत्व सुधारणा कायदाविरोधात मुंबईतही आंदोलन करण्यात आलं. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले असून आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.  


नदवा महाविद्यालयात रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर विद्यार्थ्यांची गर्दी केली होती. सुरक्षेसाठी तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच गृह विभागाकडून प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.