स्कूल बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक आणि...
असे वाचवले विद्यार्थ्यांचे प्राण
नवी दिल्ली : लुधियानाच्या एक प्रसिद्ध शाळेच्या बस चालकाने प्रसंगावधान बाळगत अनेक विद्यार्थांचे प्राण वाचवले आहेत. चालत्या गाडीमध्ये चालकाला ह्रदय विकाराचा धक्का आल्यामुळे बसमधील मुलांचा जीव धोक्यात होता. परंतु या चालकाने विद्यार्थांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात स्वत:चा जीव गमावला आहे. ही घटना लुधियानाच्या चंदिगड रोडवर कर्करोग रूग्णालयाकडे असलेल्या पुलाजवळ ही घडली आहे.
या घटनेसंबंधी बसधील विद्यार्थ्यांनी माहिती दिली. जेव्हा चालक बस चालवत होता तेव्हा अचानक काहीतरी झाले आणि त्याने गाडी पुला खाली थांबवली. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
बसमध्ये असलेल्या काही पालकांनी तात्काळ चालकाला रूग्णालयात दाखल केले. त्याचप्रमाणे बाकी विद्यार्थ्यांच्या पालकांना घडलेल्या घटनेची कल्पना दिली. या घटनेची खंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली.
फार मोठी घटना होता-होता टळली आहे. पण या दुर्दैवी घटनेत बस चालकाने मात्र आपले प्राण गमावले आहे. अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली. मुलांना शाळेत सोडताना चालकाला अचानक ह्रदय विकाराचा धक्का आाला. त्यानंतर त्याने तात्काळ बस थांबली.
अचानक ह्रदय विकाराचा धक्क आल्यामुळे त्याला जवळच्या सीव्हील रूग्णालयात दाखल करण्यात आहे. परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.