नवी दिल्ली :  आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा देखील म्हणतात. या वर्षी रविवार, ५ जुलै २०२० रोजी साजरा करण्यात येणार आहे. शिवाय गुरुपौर्णिमेला चंद्रग्रहण देखील दिसणार आहे. म्हणून चंद्रग्रहणाचा हा योगायोग आश्चर्यकारक ठरणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहणाचा हा तिसरा योगायोग आहे. असा योग यापूर्वी २०१८ आणि २०१९ रोजी आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय ३० दिवसात तिसऱ्या ग्रहणाचा योगायोग जवळपास ५० वर्षांनंतर आला आहे. ५ जुलैला दिसणारा चंद्रग्रहण उपछाया चंद्रग्रहण असणार आहे. भारतीय वेळेनुसार हा चंद्रग्रहण सकाळी ८.३४ ते ९.२५ यावेळेत दिसणार आहे. पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेतून चंद्र जाणार आहे. 


चंद्र ग्रहण दक्षिण आशियाच्या काही भागांमध्ये दिसणार आहे. अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया ग्रहण दिसू शकतो. शिवाय,  उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेत चंद्र ग्रहण दिसणार आहे. हा चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.