१४९ वर्षांनंतर चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योग
खंडग्रास चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योग पुन्हा जुळून आला.
मुंबई : १४९ वर्षांनंतर खंडग्रास चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योग पुन्हा जुळून आला. १४९ वर्षांपूर्वीही गुरुपौर्णिमेच्या दिवशीच चंद्राला ग्रहण लागले होते. त्यावेळी चंद्र हा शनी आणि केतूबरोबर धनू राशीत होता. तर सूर्य राहूसोबत मिथून राशीमध्ये होता. मंगळवारी मध्यरात्री असाच योग पुन्हा जुळून आला आणि रात्री १ वाजून ३१ मिनिटांनी चंद्रग्रहणाला सुरुवात झाली. पहाटे साडेचार वाजेपर्यंत हे ग्रहण दिसले.
उत्तर अमेरिका वगळता जगभरातून चंद्रग्रहण पाहता आले. याचे नेत्रसुख देशातील अनेक भागातून घेण्यात आले. भारतातल्या प्रत्येक भागातून हे चंद्रग्रहण थेट पाहायला मिळाले. आता भारतात पुढचे चंद्रग्रहण २६ मे २०२१ ला दिसणार आहे. तेव्हा चंद्राला पूर्ण ग्रहण लागेल. भुवनेश्वरच्या आकाशातून हे चंद्रग्रहण दिसले. आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि दक्षिण अमेरिका या देशातही ग्रहण पाहता आले.
भुवनेश्वरच्या आकाशातून
दिल्ली येथे असा दिसला चंद्र